♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

फायद्याची बातमी – FD पेक्षा जास्त व्याजदर देणार्या पोस्टाच्या ह्या योजना माहित असुद्या

MH 28 News Live : बँक एफडीवर (FD) मिळणाऱ्या कमी व्याजदरामुळे लोक इतर गुंतवणुकीचे पर्याय शोधत आहे, पण, आर्थिक अस्थिरतेच्या काळात लोक सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असतात. अशावेळी पोस्ट ऑफिसच्या योजना कामी येऊ शकतात.

येथे गुंतवणूक सुरक्षित आणि जास्त परतावा देखील मिळतो आहे. अशाच काही पोस्ट ऑफिसच्या योजनांबाबत माहिती असुद्या.

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट

तुम्हाला NSC मधील गुंतवणुकीवर वार्षिक ८ % व्याज मिळते. वार्षिक आधारावर व्याज मोजले जाते. परंतु कालावधी संपल्यानंतर तुम्हाला ही रक्कम मिळते. तुम्ही किमान रु.१००० पासून गुंतवणूक करू शकता. गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही. अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने NSC खाते आणि ३ प्रौढांच्या नावाने संयुक्त खाते उघडता येते. विशेष म्हणजे १० वर्षांपेक्षा जास्त वयाची मुले देखील पालकांच्या देखरेखीखाली हे खाते उघडू शकतात. या योजनेअंतर्गत आयकर कलम ८० C अंतर्गत तुम्ही ५ लाख रु. पर्यंत कर वाचवू शकता.

मंथली इनकम स्कीम

या योजनेअंतर्गत, गुंतवणूकदारांना मासिक ठराविक रक्कम कमावण्याची संधी मिळते. या योजनेत तुम्हाला एकरकमी रक्कम एकल किंवा संयुक्त खात्यात जमा करावी लागेल. त्यानंतर ही रक्कम दर महिन्याला तुमच्या खात्यात जमा होते. एकल खाते असेल तर येथे तुम्ही जास्तीत जास्त ५ लाख, रुपये जमा करू शकता. संयुक्त खाते असल्यास कमाल रु. ९ लाख जमा करता येतील. या योजनेतील मॅच्युरिटी कालावधी ५ वर्षांचा आहे. या योजनेअंतर्गत ६.६ टक्के वार्षिक व्याजदर दिला जात आहे.

किसान विकास पत्र

KVP: या योजनेत गुंतवणूकीची किमान रक्कम रु. १००० आहे. गुंतवणुकीसाठी वय १८ वर्षे असणे आवश्यक आहे. अल्पवयीन मुले गुंतवणूक करू शकतात परंतु पालकांच्या देखरेखीखाली. या योजनेवर सध्या ९ टक्के व्याज मिळत आहे. एकल खाते आणि संयुक्त खाते सुविधा. लॉक इन कालावधी अडीच वर्षे आहे पण, गुंतवणुकीची रक्कम काढण्यासाठी तुम्हाला ५ वर्षे वाट पाहावी लागेल. आयकरात कलम ८० C अंतर्गतही सवलत आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129