♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

आता रेशन कार्डशिवायही मिळणार धान्य. ‘ वन नेशन वन कार्ड ‘ योजनेत मोदी सरकारचा मोठा निर्णय

MH 28 News Live : एखाद्या व्यक्तीचं रेशनकार्ड त्याच्या मूळ राज्यात असेल आणि तो नोकरीनिमित्त दुसऱ्या शहरात आपल्या कुटुंबासह राहत असेल, तर त्याला त्याचा रेशनकार्ड क्रमांक आणि आधार कार्डची माहिती देऊन कोणत्याही दुकानातून रेशन धान्य मिळू शकतं. यासाठी मूळ रेशन कार्ड दाखवण्याची गरज नाही. ही सुविधा घेण्यासाठी आता रेशन कार्ड सोबत (Ration Card) ठेवणं आवश्यक असणार नाही. केंद्र सरकारने आज संसदेत याबाबत घोषणा केली.

कसा मिळणार लाभ ?

याबाबत अधिक माहिती देताना अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं, की आता रेशन कार्डधारकांना रेशनची सुविधा घेण्यासाठी रेशन कार्ड दाखवण्याची गरज नाही. आतापर्यंत रेशन धान्य दुकानात धान्य घेताना शिधापत्रिकाधारकांना रेशन कार्ड द्यावे लागत होते. परंतु, आता रेशन कार्ड धारक जिथे राहतात, तिथे जवळच्या रेशन धान्य दुकानात रेशन कार्ड नंबर आणि आधार नंबर सांगावा लागेल. त्यानंतर त्यांना सहजपणे रेशन मिळेल.

नियमांत होणार मोठा बदल

आता केवळ याच लोकांना मिळणार धान्य पियुष गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेशन कार्ड प्रक्रिया अधिक सोपी करण्यात आली आहे. देशात वन नेशन वन रेशन कार्डची सुविधा लागू करण्यात आली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशात वन नेशन वन रेशन कार्डद्वारे ७७ कोटी लोकांना जोडण्यात आलं आहे. यात रेशन कार्ड वापरणाऱ्यांची संख्या ९६ . ८ टक्के आहे. यात ३५ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील लोकांना सामिल करण्यात आलं आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129