♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

” गहू निसून ठेव ” असं सांगून आई बाहेर गेली आणि घरात मुलीने आत्महत्या केली

MH 28 News Live, मोताळा : १८ वर्षीय तरुणीने राहत्या घरात विष घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज, २२ मार्चला सकाळी साडेनऊच्या सुमारास मोताळा तालुक्यातील काबरखेड येथे घडली.

वैष्णवी विलास सोनुने (रा. काबरखेड) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तिच्या आईने तिला गहू निसून ठेव. काडीकचरा व्यवस्थित काढून ठेव, असे सांगितले. त्‍यानंतर तिचे आई -वडील शेतात निघून गेले. घरात कुणी नव्हते. त्‍यानंतर तिने विष घेतले. काही वेळाने भाऊ घरी आला असता त्याला तिने विष घेतल्याची माहिती दिली. त्यामुळे भावाने वडिलांना कॉल करून घटनेची माहिती दिली. वडिलांनी तातडीने घरी धाव घेऊन मुलीला उपचारासाठी बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. मात्र तोपर्यंत तिचा मृत्‍यू झाला होता. डॉ. अपूर्वा राजनकर यांनी तपासून तिला मृत घोषित केले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129