
एप्रिलमध्ये बँकांना तब्बल १५ दिवस लागणार टाळे. तारांबळ टाळण्यासाठी आजच करा नियोजन
MH 28 News Live : सध्याच्या आर्थिक वर्ष संपण्यास साठी एक आठवडा उरला आहे मात्र येणार्या नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे एप्रिल 2022 मध्ये राष्ट्रीयीकृत बँकांना बक्कळ सुट्ट्या आल्या आहेत आले असून त्यांची एकूण १५ सुट्या आल्या आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात एप्रिल महिन्यात दहा दिवस बँकांचे कामकाज १० बंद असून असल्यामुळे ग्राहकांची ग्राहकांची मोठी तारांबळ उडणार असल्याचे दिसते. ही तारांबळ टाळायची असेल तर खालील सुट्यांची यादी वाचा आणि आजच आपल्या कामांचे नियोजन करा.
एप्रिल महिन्यात गुढी पाडवा, बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सणांमुळे बँका १५ दिवस बंद राहणार आहेत. आरबीआयने एप्रिलमधील बँक हॉलिडेंची यादी जारी केली आहे. यामध्ये साप्ताहिक सुट्ट्या देखील आहेत.
या सुट्ट्या देशभरात एकाचवेळी लागू असणार नाहीत. त्या त्या राज्यांनुसार, स्थानिक सणांनुसार या सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत. परंतू या राज्यातून त्या राज्यात व्यवहार करणाऱ्यांना, आपले राज्य सोडून दुसऱ्या राज्यात रोजगारासाठी गेलेल्यांना या सुट्ट्या महत्वाच्या आहेत.
ह्या आहेत सुट्या…
१ एप्रिल – नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात आणि क्लोजिंगमुळे सर्व राज्यांतील बँका बंद असतात.
२ एप्रिल – गुढी पाडवा
३ एप्रिल – रविवार
४ एप्रिल – सरिहुल- रांचीमध्ये बँका बंद
५ एप्रिल – बाबू जगजीवन राम जयंती; हैदराबादमध्ये सुटी
९ एप्रिल – दुसरा शनिवार
१० एप्रिल – रविवार
१४ एप्रिल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
१५ एप्रिल – गुड फ्रायडे
१६ एप्रिल – बोहाग बिहू- गुवाहाटीमध्ये सुटी
१७ एप्रिल – रविवार
२३ एप्रिल – चौथा शनिवार
२४ एप्रिल – रविवार
२९ एप्रिल – शब-ई-कद्र/जुमात-उल-विदा; जम्मू आणि श्रीनगरमध्ये बंद



