
ग्रंथप्रेमींसाठी पर्वणी… जिल्हा ग्रंथालयात शुक्रवारी ग्रंथप्रदर्शन
MH 28 News Live, बुलडाणा : मराठी भाषा पंधरवाड्यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा ग्रंथालयाच्या वतीने ग्रंथप्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा ग्रंथालयात सायंकाळी पाच वाजता ग्रंथप्रदर्शन आणि त्यानंतर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथ प्रदर्शनी शुक्रवार, दि. २७ जानेवारी आणि शनिवार, दि. २८ जानेवारी या दोन दिवशी सर्वांसाठी नि:शुल्क खुली राहणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी केले आहे.