
काल संपलेल्या आर्थिक वर्षात किती झाली GST वसुली माहित आहे का ?
MH 28 News Live : कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यामुळे कोलमडलेली भारताची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येताना दिसत आहेत. जीएसटी संकलनाची(GST Collection) मार्च महिन्याची आकडेवारी समोर आली आहे.
या आकडेवारीवरुन भारताची अर्थव्यवस्था सुधारत असल्याचे जाणवत आहे. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मार्च महिन्यात जीएसटी संकलन १ . ४२ लाख कोटी रुपये झाले आहे.
२०२० च्या तुलनेत ४६ ℅ अधिक संकलन
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ च्या जीएसटी संकलनात गेल्या वर्षीच्या मार्च महिन्याच्या तुलनेत १५ टक्के वाढ झाली आहे. तर, मार्च २०२० च्या तुलनेत जीएसटी संकलनात ४६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अर्थ मंत्रालयाने म्हटले की, “एकूण GST संकलन मार्च २०२२ मध्ये नवीन उच्चांकावर पोहोचले आहे. या आकडेवारीने जानेवारी २०२२ च्या १, ४०, ९८६ कोटी रुपयांच्या पूर्वीच्या विक्रमाला मागे टाकले आहे.”
कलेक्शनाचा सोर्स जाणून घ्या
मार्च २०२२ मध्ये एकूण जीएसटी संकलन १, ४२, ०९५ कोटी रुपये झाले आहे. यामध्ये CGST द्वारे सरकारला रु. २५, ८३० कोटी, SGST द्वारे रु. ३२, ३७८ कोटी, IGST द्वारे रु. ७४, ४७० कोटी (माल आयातीतून रु. ३९, १३१ कोटी उत्पन्नासह) आणि रु. ९, ४१७ कोटी उपकर (माल आयातीच्या ९८१ कोटींसह) आहे.
चौथ्या तिमाहीतील सर्वोत्तम कलेक्शन
आर्थिक वर्ष २०२१ – २२ च्या चौथ्या तिमाहीत सरासरी मासिक सकल GST संकलन १ . ३८ लाख कोटी रुपये होते. पहिल्या तिमाहीत सरासरी १ . १० लाख कोटी रुपये, दुसऱ्या तिमाहीत १ . १५ लाख कोटी रुपये आणि तिसऱ्या तिमाहीत १ . ३० लाख कोटी रुपये होते.
असे झाले सेटलमेंट
मार्च महिन्यात सरकारने CGST मध्ये २९, ८१६ कोटी रुपये आणि IGST पैकी २५, ०३२ कोटी रुपये जमा केले आहेत. रेगुलेर आणि एड-हॉक सेटलमेंटनंतर, मार्च २०२२ मध्ये केंद्राचे एकूण उत्पन्न ६५, ६४६ कोटी रुपये आणि राज्याचे एकूण उत्पन्न ६७, ४१० कोटी रुपये होते. मंत्रालयाने म्हटले की, “आर्थिक पुनर्प्राप्ती आणि चोरीला आळा घालण्यासाठी केलेल्या कारवाईमुळे, विशेषत: बनावट बिल देणाऱ्यांविरुद्ध जीएसटी संकलनात वाढ झाली आहे.”