
एसटी संपाबद्दल आजची सुनावणी उद्या होणार
MH 28 News Live : एसटी कामगारांच्या संपाविरोधात एसटी महामंडळाचा अवमान याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली आता ही सुनावणी उद्या देखील सुरु राहणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली असून सरकारने ST बाबत काय निर्णय घेतला आहे ? हे आम्हाला पाहायचे आहे असं न्यायमुर्ती म्हणाले.
त्यावर महामंडळाच्या वकीलांना युक्तीवाद करत बाजू मांडली ते म्हणाले, ‘औद्योगिक न्यायालयाने संप बेकायदेशीर ठरवून सुद्धा निर्णय देऊन पण संप मागे घेण्यात आला नाही याचिका मागे घेत आहोत असा युक्तीवाद कोर्टात करण्यात आला.
त्यावर मुख्य न्यायमूर्ती म्हणाले, आम्हाला कामगारांची बाजू ऐकणे गरजेचे आहे. मध्यम मार्ग काढणे गरजेचे त्रिसदस्यीय समितीने दिलेला अहवाल सरकारने मान्य केला आहे. विलिनीकरण होऊ शकत नाही, परंतु सोडून बाकी मुद्द्यावर सहमती असल्याचं ऍड नायडू म्हणाले. दरम्यान या याचिकेवर उद्या १०.३० वाजता परत सुनावणी होणार आहे.



