
फक्त ई मेल वाचा अन् कमवा घरबसल्या पैसे
MH 28 News Live : जास्त पैसे कमावणं कोणाला आवडत नाही ? महिन्याच्या ठरावीक उत्पन्नापेक्षा आपल्याला जास्त पैसे कमावता आले आणि तेही घरबसल्या, तर नक्कीच ते तुम्हालाही आवडेल.
घरबसल्या भरपूर उत्पन्न मिळवण्याचे अनेक पर्याय आता इंटरनेटद्वारे उपलब्ध होत आहेत. आतापर्यंत तुम्ही काही काम करून मग पैसे मिळवल्याचं वाचलं असेल; पण फक्त ईमेल वाचून पैसे कमावले जाऊ शकतात असं तुम्हाला सांगितलं तर त्यावर तुमचा विश्वास बसेल का? पण हे खरं आहे. जगभरात अनेक अशा वेबसाइट्स आहेत, ज्यांच्याद्वारे ई-मेल्स आणि सर्वेक्षण करण्याचे पैसे दिले जातातत.
तिथे काम करण्यासाठी कोणतंही बंधन किंवा अटी नसतात. म्हणजेच तुम्हाला हव्या त्या वेळेत तुम्ही काम करू शकता. मनी मेल डॉट कॉम (www.Moneymail.in) या वेबसाइटवर तुम्ही १५ मिनिटं ई-मेल्स वाचून कमाई करू शकता. या वेबसाइटच्या माध्यममातून तुम्ही महिन्याला १०. ००० रुपयांपर्यंत कमावू शकता.
एक ई-मेल वाचण्यासाठी तुम्हाला २० पैसे ते २०० रुपयांपर्यंत शुल्क दिले जाते. त्यासाठी तुम्हाला दरोज तुमच्या अकाउंटवर लॉग इन करणं गरजेचं आहे आणि इनबॉक्स वाचणंही आवश्यक आहे. तुम्ही आणखी एखाद्याचं अकाउंट केलंत तर तुम्हाला १०० रुपयांपर्यंत शुल्क दिलं जाऊ शकतं. मॅट्रिक्स मेल डॉट कॉम (www.matrixmails.com) ई-मेलच्या माध्यमातून पैसे कमावण्यासाठी ही वेबसाइट हा एक उत्तम पर्याय असू शकतो. २००२ सालापासून ही वेबसाइट काम करत आहे.
या वेबसाइटच्या माध्यमातून तुम्हाला ई-मेल वाचून, काही ऑफर्सच्या माध्यमातून, साइटला व्हिजिट करून किंवा आणखी काही जणांना त्याबद्दल माहिती देऊन पैसे कमावता येतात. या माध्यमातून एका तासात तुम्ही जवळपास २५ ते ५० डॉलर्स म्हणजेच जवळपास ३००० रुपये मिळवू शकता. कॅश फॉर ऑफर डॉट कॉम (www.Cash$offers.com) या वेबसाइटच्या माध्यमातूनही तुम्ही पैसे कमवू शकता. तुम्ही या वेबसाइटचे गोल्ड मेंबर झालात, की त्यानंतर ७२ तासांच्या आत तुम्हाला पेमेंट केलं जातं.
ई-मेल वाचून, सर्व्हेजच्या माध्यमातून, कॅश ऑफर्सच्या माध्यमातून, ऑनलाइन गेम्स खेळून आणि मित्रांचं अकाउंट तयार करून तुम्ही पैसे कमावू शकता. वेबसाइटवर साइन इन केल्याबरोबर लगेचच तुम्हाला जवळपास ५ डॉलर्स म्हणजे डॉलर्स म्हणजे ३०० ते ३५० रुपये मिळू शकतात. सेंडर अर्निंग डॉट कॉम (www.Senderearnings.com) या वेबसाइटवर तुम्ही ई-मेल, सर्व्हे, ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून पैसे मिळवू शकता. यासाठी तुम्हाला तुमचं अकाउंट उघडून रजिस्ट्रेशन कन्फर्म करणं आवश्यक आहे.
तिथे तुम्हाला एक ई-मेल वाचण्यासाठी १ डॉलर म्हणजेच जवळपास ७० रुपये दिले जातात. तुम्ही सहा महिन्यांत एकदाही या साइटला भेट दिली नाही तर तुमचं अकाउंट डिअॅक्टिव्हेट केलं जातं. पेमेंटसाठी अर्ज करताना तुमच्या अकाउंटमध्ये कमीत कमी कमीत कमी ३० डॉलर्स म्हणजे २१०० रुपये असणं आवश्यक आहे. पैसा लाइव्ह डॉट कॉम (www.Paisalive.com) तुम्हाला एकही पैसा न गुंतवता अगदी वेगानं पैसा कमवायचा असेल तर ही वेबसाइट त्यासाठी उत्तम पर्याय आहे. पैसा लाइव्हवर अकाउंट तयार केल्याबरोबर तुम्हाला ९९ रुपये मिळतात.
तुम्ही तुमच्या अन्य १० मित्रांना याबद्दल सांगितलं आणि त्यांची अकाउंट्स तयार केली तर त्यासाठी तुम्हाला १० रुपये दिले जातात. पहिल्या १० जणांनंतर प्रत्येक जणाचं अकाउंट तयार केल्यास तुम्हाला 2 रुपये मिळतात. इनबॉक्समध्ये मेल वाचल्यावर तुम्हाला 25 पैसे ते 5 रुपयांपर्यंत शुल्क दिलं जातात. वेबसाइटकडून 15 दिवसांतून एकदा चेकने पेमेंट केलं जातं. तेव्हा घरबसल्या जास्तीचं उत्पन्न मिळवायचं असेल तर या पर्यायांचा विचार नक्की करा; पण त्यासाठी आधी योग्य ती माहिती सर्व मिळवा, त्यांच्या नियम व अटी काळजीपूर्वक वाचा आणि नंतरच अकाउंट तयार करा. तुमची अत्यंत खासगी माहिती शक्यतो कुणालाही शेअर करू नका.



