
रूग्णवाहिकेतच दिला तिने मुलाला जन्म, मेहकर तालुक्यातील घटना
MH 28 News Live, मेहकर : तालुक्यातील मोळी येथील स्वाती वानखेडे नामक महिलेला येथील ग्रामिण रुग्णालयात सकाळी प्रसूतीसाठी भरती करण्यात आले. त्यांच्या रक्ताची चाचणीत 4.6 इतके कमी रक्त असल्या कारणाने बुलढाणा येथे उपचारार्थ दाखल करण्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. दरम्यान स्वाती हिने रूग्णवाहिकेतच मुलाला जन्म दिला.
प्राप्त माहितीनुसार, स्वाती वानखेडे हिला 108 गाडी क्रंमाक एम एच 14 सी एल 1308 ने बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात येत होते. दरम्यान वाटेतच बुलढाणा शहराच्या अलिकडे साखळी फाट्याजवळ सदर महिलेचे पोट दुखत असल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक पिसे यांनी आपतकालीन सहकारी पायलट संदीप पागोरे यांच्या सहकार्याने अतिशय बिकट परिस्थितीत साधारण प्रस्तुती पार पाडावी लागली. आईची व मुलाची प्रकृती अतिशय ठणठणीत असून तिला जिल्ह्या रुग्णालयात भरती केले आहे. येथील आरोग्य अधिकारी यांनी डॉक्टर व पायलट यांचे 108 गाडी वरील कर्मचारी यांचे कौतुक केले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button