
सवडद येथे कुपोषित विद्यार्थ्याचा मृत्यू
MH 28 News Live, सिंदखेड राजा : तालुक्यातील साखरखेर्डा येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या सवडद येथे अकरावीत शिकणाऱ्या एका कुपोषित विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवार १० एप्रिल रोजी दुपारी उघडकीस आली. वैभव साहेबराव मोरे वय १८ असे या दुदैवी विद्यार्थाचे नांव असून मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार तो बालपणापासून कुपोषित होता. दरम्यान या घटनेमुळे गावासह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.