♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

शेगाव पोलीस शहरातील सामाजिक वातावरण बिघडवत आहेत; आ. डॉ. संजय कुटे यांचा आरोप. उद्या करणार धरणे आंदोलन

MH 28 News Live, शेगाव : काल रात्री येथील एमटीडीसी परिसरात आनंद मेलामधील हवाई झूले खेळताना काही युवकांचा आपसात वाद झाला. शहरातील मान्यवरांनी तो वाद वेळीच मिटविला; परंतु पोलिसांनी या प्रकरणात एका गटाच्या नऊ जणांच्या विरुद्ध 353 कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना पोलिस कोठडीमध्ये डांबले. शेगाव शहर पोलिसांनी याबाबत खोटेनाटे सोंग करून तडजोड झालेल्या प्रकरणात एकमेकांना दबावात घेऊन तक्रार घेतली आणि खोटी तक्रार व खोटे गुन्हे दाखल करून या प्रकरणात अन्याय केल्याने पोलिसांच्या कारवाईचा निषेध करून हे गुन्हे परत मागे घ्यावी म्हणून आणि बेकायदेशीर आनंद मेला चालू देणार्या अधिकार्यांविरुध्द धरणे आंदोलन करण्याचा इशारा आ. डॉ. संजय कुटे यांनी दिला आहे.

शेगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत आ. डॉ. संजय कुटे यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. सदर वादाचे मुळ असलेल्या आनंद मेला मधील झूले परवानगी नसतानाही कसे सुरु राहिले ? यासाठी आर्थिक व्यवहार झाला असावा अशी शंका व्यक्त करून परवानगीशिवाय चालणाऱ्या या आनंद मेल्याला जबाबदार असलेला अधिकारी व खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांना तातडीने चौकशी करून जाब विचारावा या मागणीसाठी उद्या सकाळी 9 ते 12 च्या दरम्यान गांधी चौकात धरणे आंदोलन करणार करण्यात येणार असल्याचे आ. कुटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले. याबाबत जिल्ह्यात विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने प्रत्येक तहसील कार्यालयात निवेदन दिले जाईल. पोलिसांकडून जिल्ह्यात विविध ठिकाणी खोटे गुन्हे दाखल करून 353 चा दुरुपयोग होत असल्याने याची चौकशी करण्यासाठी हे निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी डॉ. संजय कुटे यांनी दिली. पत्रकार परिषदेला बजरंग दलाचे अमोल अंधारे, भाजपाचे शहराध्यक्ष ज्ञानेश्वरआप्पा साखरे, दीपक शर्मा, पुरुषोत्तम हाडोळे, गजानन जवंजाळ, राजेंद्र भिसे यांच्यासह भाजपचे नेते हजर होते.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129