♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

“संघर्ष शेतकरी स्वातंत्र्य लढ्याचा ” पुस्तकाचे होणार 18 एप्रिलला प्रकाशन

MH 28 News Live, चिखली : शेतकरी नेते शरद जोशी यांच्या सोबत शेतकरी चळवळीत काम केलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा “संघर्ष शेतकरी स्वातंत्र्य लढ्याचा ” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा 18 एप्रिल रोजी स्थानिक कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या सभागृहात दुपारी 12 वाजता पार पडणार आहे.

उत्कृष्ट संसदपटू शेतकरी नेते माजी आमदार वामनराव चटप यांच्या शुभ हस्ते तर पालकमंत्री ना.डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार सरोजताई काशीकर, स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट, शेतकरी संघटनेचे प्रांतध्यक्ष ललित बहाळे,
आमदार श्वेता महाले, माजी आ. राहुल बोंद्रे, चळवळीचे साहित्यिक गंगाधर मुटे, बुलढाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक, माजी आ. तोताराम कायंदे, मा आ.डॉ शशिकांत खेडेकर, माजी नगराध्यक्षा प्रिया बोद्रे, सामाजिक कार्यकर्ते रमेशअण्णा मूळे, बाजार समितीचे मुख्य प्रशासक नदुभाऊ सवडतकर, आनंदी शि प्र मंडळ बुलडाणाचे अध्यक्ष राजेंद्र वाघ, विदर्भ राज्य समितीचे जिल्हा अध्यक्ष ऍड. सुरेशराव वानखेडे यांची उपस्थिती लाभणार आहे.

घरावर तुळशीपत्र ठेवून शेतकऱ्यांसाठी चळवळीला वाहून घेतलेल्या या ध्येयवेड्याच्या संघर्षाची गाथा सत्यघटनेवर आधारित तेजराव मुंढे लिखित पुस्तकरूपाने जनतेसमोर आणण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे तरी या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास कणखर यांनी केले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129