♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

युवतीला विष पाजून मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांना सात वर्षे कारावास. पाच वर्षांपूर्वीच्या घटनेवर जिल्हा न्यायालयाचा निकाल

MH 28 News Live, चिखली : अमडापूर पोलिस स्टेशनअंतर्गत कव्हळा येथे एका तरूणीला तिच्या शेजारच्यांनी बळजबरीने विष पाजून मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात जिल्हा न्यायाधीशांनी सात जणांना सात वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

7 फेब्रुवारी 2017 रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान फिर्यादी शोभा कल्याणकर ही आपल्या आईसमवेत घरी जेवण करीत असतांना दिपक अशोक राऊळकर, अशोक पुंजाजी राऊळकर, जिजाबाई अशोक राऊळकर, मनिषा शिवदास घन, रेखा दिपक राऊळकर, रामेश्वर देवराव राऊळकर, लक्ष्मण देवराव राऊळकर व नामदेव देवराव राऊळकर सर्व रा. कव्हळा आमच्या जागेत सायकल का लावली. या कारणावरून फिर्यादीचे केस पकडले व तिला ओढत बाहेर आणले. अशोक व जिजाबाई यांनी हात पकडून ठेवले. दिपक आणि मनिषा यांनी विषारी औषधाची बाटली फिर्यादीच्या तोंडाला लावून तिला पाजण्याच्या प्रयत्न केला. तसेच रामेश्वर व नामदेव यांनी मारहाण केली व लक्ष्मणने दगड फेकून मारला. त्यामुळे फिर्यादीचे डोके फुटून तिला जखम झाली. अशा प्रकारची फिर्याद फिर्यादीचे 7 फेब्रुवारी रोजीच सामान्य रूग्णालय बुलढाणा येथे नोदविण्यात आलेल्या जबाबाच्या आधारे अमडापूर पोस्टेला दाखल केली होती. त्याआधारे अमडापूर पोस्टेला आरोपीविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. प्रकरणाचा तपास पुर्ण झाल्यानंतर आरोपीविरूद्ध दोषारोपपत्र दाखल झाले.

या प्रकरणात फिर्यादी पक्षातर्फे एकूण 13 साक्षीदाराच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. यामध्ये फिर्यादी स्वतः फिर्यादीची आई, बहिण, फिर्यादीला आरोपीच्या तातडीतून सोडवणिारे माधव मोतीराम काकडे, पंचसाक्षीदार तसेच फिर्यादी ही प्राथमिक आरोग्य केंद्र अमडापूर, चिखली येथे प्राथमिक उपचार घेऊन नंतर सामान्य रूग्णालय बुलढाणा येथे 6 दिवस भरती असल्या कारणाने संबंधीत वैद्यकीय अधिकारी डॉ. विजया खरपास, डॉ. सोनल खार्डे, खालीद अहमद गुन्हा नोंदविणार पोहेकॉ राजेश गवई व तपास अधिकारी मिलींद पाठक यासाक्षीदारांच्या साक्षी सरकारी पक्षातर्फे नोदविण्यात आल्या असून महत्वुपर्ण ठरल्या. साक्षीदाराच्या साक्षी घटनेला पुरक, सुसंगत व विश्वासार्ह असल्या कारणाने तसेच सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील अ‍ॅड सोनाजी सावजी देशपांडे यांनी सरकारी पक्षाची बाजू न्यायालयासामोर मांडल्याकारणाने त्यांच्या आधारे व त्यांनी केलेला प्रभावी युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली तर आरोपी रेखा दिपक राऊळकर हिची निर्दोष मुक्तता केली.

पोहेकॉ संजय ताठे यांनी कोर्ट पैरवी म्हणून सहकार्य केले. प्रकरणात 20 डिसेंबर रोजी निकाल देतांना जिल्हा न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी शोभा कल्याणकर या युवतीला कव्हळा येथील घराशेजारी राहणार्‍या दिपक अशोक राऊळकर व इतर सहा आरोपीना बळजबरीने विष पाण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी तसेच तिला जखमी केल्याप्रकरणी सातही आरोपीना सात वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व प्रत्येकी 1 हजार दंड, दंड न भरल्यास एक महिला कारावास भादवीचे कलम अंतर्गत प्रत्येकी 5 हजार वर्ष शिक्षा व रू एक हजार दंड, दंड न भरल्यास एक महिना कारावास व प्रत्येकी एक वर्ष कारावास व प्रत्येकी एक हजार दंड तसेच दंड न भरल्यास एक महिना कारावास सुनावला आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129