♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

राजकारण बाजूला ठेवत श्वेताताईंनी घेतली शिवाराकडे धाव ! मुंबईवरून परतताच आमखेडच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधाला दिली भेट

 

MH 28 News Live / चिखली : गेल्या दोन दिवसांपासून चिखलीच्या राजकारणात राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशावरून मोठी राजकीय उलथापालथ सुरू होती. भाजप प्रवेशाची तयारी झाल्यानंतर काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी ऐनवेळी निर्णय बदलत काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. या प्रवेशासाठी आमदार श्वेता महाले मुंबईत गेल्या होत्या. मात्र, राजकीय घडामोडींनंतर चिखलीत परतताच महाले यांनी राजकारणाला बाजूला ठेवून दुष्काळी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे मोर्चा वळवला

राजकीय चर्चेला पूर्णविराम; महाले थेट शेताच्या बांधावर

मुंबईतील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर चिखलीत परतलेल्या आमदार श्वेता महाले यांनी आमखेडकडे धाव घेतली. आमखेड येथील श्री. वाघ यांच्या शेतावर जाऊन त्यांनी दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. पावसाच्या अनिश्चिततेमुळे आणि प्रतिकूल हवामानामुळे पिकांसमोर निर्माण झालेल्या संकटाची माहिती त्यांनी शेतकऱ्यांकडून घेतली. कृषी अधिकाऱ्यांकडून पिकांची सद्यस्थिती जाणून घेतली. यावेळी कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. महाले यांनी शेतातील पिकांची सद्यस्थिती, संभाव्य नुकसान आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. तसेच शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

 

‘संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी’

नैसर्गिक आपत्तीच्या काळात महायुती सरकार शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे, असे महाले यांनी यावेळी नमूद केले. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थिती समजून घेणे आणि त्यांच्या प्रश्नांसाठी शासनस्तरावर आवश्यक पाठपुरावा करणे सुरूच राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष

राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर आमदार श्वेता महाले यांची मुंबईतील उपस्थिती चर्चेत होती. मात्र, बोंद्रे यांनी ऐनवेळी भाजप प्रवेशाचा निर्णय मागे घेतल्यानंतर या राजकीय घडामोडींना वेगळे वळण मिळाले. त्यानंतर चिखलीत परतलेल्या महाले यांनी राजकीय विषयांपेक्षा दुष्काळी परिस्थितीने त्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणींना प्राधान्य देत थेट शेतशिवार गाठल्याचे चित्र आमखेड येथे पाहायला मिळाले.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129