♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

शिक्षक नियुक्तीचा वाद पेटला; प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात मिसाळवाडीच्या ग्रामस्थांनी शाळेलाच ठोकले कुलूप

 

MH 28 News Live / चिखली : तालुक्यातील मिसळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षकाची नियुक्ती रद्द करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली होती. जिल्हा परिषद प्रशासनाने या मागणीची दखल न घेतल्यामुळे अखेर गावकऱ्यांनी दि.१९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता शाळेच्या गेटला कुलूप ठोकले. निर्णय न झाल्यास जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या दालनात बसून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी संतप्त गावकऱ्यांनी दिला.

मिसळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेवर सहाय्यक शिक्षक अनिल दांडगे यांची नियुक्ती केली होती. जिल्हा परिषद प्रशासनाने दांडगे यांची केलेली नियुक्ती गावकऱ्यांना मान्य नव्हती. याबाबत गावकऱ्यांनी झालेली नियुक्ती मान्य नसल्याचे जिल्हा प्रशासनाला कळविले होते. गावकऱ्याच्या मागणीची जिल्हा परिषद प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे आज सकाळी दहा वाजता संतप्त झालेल्या गावकऱ्यांनीशाळेच्या मुख्य गेटला कुलूप ठोकले. सोमवार पर्यंत निर्णय न झाल्यास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात बसून आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी यावेळी दिला.

या आंदोलनात सरपंच विनोद मिसाळ, उपसरपंच हनुमान मिसाळ, पोलीस पाटील रवी मिसाळ, शाळा समितीचे अध्यक्ष लक्ष्मण भगत, रवींद्र भगत, समाधान मिसाळ, संजय काकडे, सुनील मिसाळ, साहेबराव मिसाळ, मंगेश मिसाळ, रुपेश मिसाळ, राम भगत, सतीश मिसाळ यांच्यासह गावकरी सहभागी झाले होते.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129