
शाहीर मनोहर पवार यांना उत्कृष्ट शाहीरी पुरस्कार जाहीर, गोव्यातील साहित्य संमेलनात होणार ५ जूनला वितरण
MH 28 News Live, चिखली : तालुक्यातील केळवद येथील साहित्यिक कवी – शाहीर मनोहर पवार यांना गोवा ‘ पणजी बोरी येथिल राज्यस्तरीय तापी पुर्णा राज्यस्तरीय उत्कृष्ठ शाहिरी कला पुरस्कार घोषीत करण्यात आला आहे.
दि. ५ जून २० २२ रोजी सुप्रसिद्ध साहित्यिक कवी बा . भ.बोरकर साहित्य नगरी बोरी फोंडा येथे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन प्रागतिक विचार मंच बोरी फोंडा गोवा आणि शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशन मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव याचे वतीने आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे अध्यक्षा प्रा. लिला फकिराव शिंदे ह्या असून उद्घाटक रमेश वंसकर हे असणार आहेत. संमेलनाचे मुख्य संयोजक शिवचरण उज्जैनकर हे असून प्रा . डॉ. प्रतिमा इंगोले ‘ डॉ. सतीश तराळ, डॉ. श्रीकांत पाटील ‘ शिवाजीराव शिदे, तुळशिराम बोबडे, जयंत रंगकर, लहूजी शेवाळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर पुरस्काराचे वितरण करण्यात येत आहे.
मनोहर पवार यांनी संपुर्ण महाराष्ट्रात साहित्याचा प्रचार प्रसार केला असून त्यानी अनेक साहित्य संमेलनात सहभाग घेतला आहे. शाहीरीच्या माध्यमातून विविध योजनांची जनजाग्रुती कला पथका व्दारे
केली असून त्यांना अनेक मानवरांच्या हस्ते गौरवण्यात आले आहे . पवार यांनी अनेक साहित्य संमेलनाच्या आयोजनात देखील सहभाग घेतला आहे. मनोहर पवार यांचे मराठी भाषा व कला संवर्धनासाठी अविरत प्रयत्न सुरु आहेत. कवी साहित्यिक बा . भ.बोरकरांच्या मातीत हा पुरस्कार मला मिळतो आहे हा माझा फार मोठा सन्मान असल्याची प्रतिक्रिया मनोहर पवार यांनी व्यक्त केली आहे.