♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

” अलविदा जिंदगी ” म्हणत त्याने संपवले जीवन; स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने केली गळफास घेऊन आत्महत्या

MH 28 News Live, साखरखेर्डा : येथील माळीपेठ परिसरातील रहिवासी एका ३० वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार ११ एप्रिल रोजी दुपारी उघडकीस आली. रवी उर्फ नारायण डिगांबर गिर्हे असे मृतक विद्यार्थाचे नांव असून तो स्पर्धा परिक्षेची तयारी करीत होता.

सोमवार दि. ११ एप्रिल रोजी एम एच २८ यू ८४९६ या दुचाकीने तो खंडोबाच्या माळरानावर गेला असता कुंडलिक माणिकराव झोरे यांच्या शेतात लिंबाच्या झाडावर लटकलेल्या अवस्थेत त्याचे प्रेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताचं साखरखेर्डा पोलीस स्टेशन चे दुय्यम ठाणेदार सचिन कानडे, पो हे कॉ अशोक काशिकर, पो हे कॉ रामदास वैराळ, पो हे कॉ कपिश काशपाक यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला

अलविदा जिंदगी….

मृतक रवी उर्फ नारायण याने मृत्यूपुर्वी आपल्या खिशात एक पत्र लिहून ठेवले होते त्यात नमूद केले होते की, जिवनात दोन पर्याय आहेत १ जगणं आणि २ मरणं. यातील मी दुसरा पर्याय निवडला असून ही माझी चूक आहे असे लिहित ” अलविदा जिंदगी ” म्हणत मी माझे जीवन संपवितो असे नमूद केले आहे. मात्र त्याने या पत्रातून आत्महत्येचे कारण स्पष्ट केले नाही. मृतक विद्यार्थ्याची घरची परिस्थिती हलाखीची असून तो भूमीहीन आहे. वडिल नसल्याने आईच मोलमजुरी करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करायची

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129