
इंजिनिअरिंग काँलेजची विद्यार्थ्यीनी चिखलीतून दोन दिवसांपासून बेपत्ता, आईने दाखल केली फिर्याद
MH 28 News Live, चिखली : मुळची चिखली तालुक्यातील मनुबाई येथील रहिवासी असलेली परंतु, सध्या गुजरात मधील सुरत येथे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला असणारी एक मुलगी चिखली येथील अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. येथील वसतिगृहात राहून शिक्षण घेणारी ही 22 वर्षीय मुलगी दि. 26 मे पासून अचानक रित्या बेपत्ता झाली असून कुटुंबीयांनी तिची शोधाशोध केली परंतु, ती कुठेही आढळून न आल्यामुळे मुलीच्या आईने चिखली पोलिसांमध्ये मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत माहिती अशी आहे की, अस्मिता प्रताप डोंगरदिवे ( २२ ) ही तरुणी स्थानिक अनुराधा इंजिनिअरिंग काँलेजमध्ये शिक्षण घेत आहे. महाविद्यालयाच्या वसतीगृहात राहणारी अस्मिता दि. २६ मे रोजी कुणालाही न सांगता अचानक वसतीगृहातून निघून गेली. तिकडे सुरतला राहणाऱ्या तिच्या कुटुंबियांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही त्यामुळे त्यांनी आपले नातलग आणि अस्मिताच्या मैत्रीणींकडे चौकशी केली. मात्र त्यांना देखील अस्मिताच्या विषयी माहिती नसल्याने तिची आई संगीता प्रताप डोंगरदिवे यांनी आपली मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद चिखली पोलिसांकडे दि. २७ मे रोजी दाखल केली. अस्मिताची उंची पाच फूट आहे. तिचा बांधा सडपातळ व केस लांब व काळे असून अंगात काळपट हिरव्या कलर चा टॉप व काळ्या कलरची लेगीन पांढर स्टॉल आणि पायात निळ्या रंगाची सॅंडल घातल्या आहेत. चिखली पोलीस पुढील तपास करत आहेत.



