
उच्च न्यायालयाने नाकारली राजीव लहानेची जमानत . सुधाकर इंगोले खून प्रकरण
MH 28 News Live, मेहकर ( रवींद्र सुरूशे ) : बुलढाणा येथील सुधाकर इंगोले यांना 25 सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास जुन्या वादातून मारहाण करण्यात आली होती त्याचा उपचार दरम्यान औरंगाबाद हॉस्पिटल येथे 2 ऑक्टोंबर रोजी मृत्यू झाला होता या प्रकरणातील आरोपी राजू लहाने यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळला आहे.
गजानन रामदास इंगोले राहणार देऊळगाव माळी यांनी पोलीस स्टेशन बुलढाणा येथे तक्रार दाखल केली होती की त्याचे चुलत भाऊ सुधाकर इंगोले यांनी 25 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी सात वाजता धाड नाक्याजवळ अजिंठा रोड बुलढाणा येथे बोलावून जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांना राजू लहाने राहणार सुंदर खेड याने व त्याच्या साथीदाराने जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर जाड वस्तीने प्रहार करून गंभीर जखमी केले. सुधाकर इंगोले यांना अपेक्स हॉस्पिटल औरंगाबाद येथे उपचारार्थ भरती केल्या असताना त्यांचा २ ऑक्टोंबर २०२२ रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबत 30 सप्टेंबर रोजी गजानन इंगोले यांनी पोलीस स्टेशन बुलढाणा तक्रार दिल्याने पोलीस स्टेशन बुलढाणा येथे राजीव लहाने यांच्यावर भादविच्या कलम 302 360 व 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान राजू लहाने याने जमानत मिळण्यासाठी प्रथम जिल्हा न्यायालय बुलढाणा येथे अर्ज केला असता त्यांचा अर्ज नामंजूर केला त्यानंतर राजु लहाने नागपूर येथे हायकोर्टात जमानत अर्ज दाखल केला असता गजानन इंगोले यांनी सरकारी वकिलांना मदत म्हणून अँड. आशुतोष वानखेडे यांना वकीलपत्र दिले. त्याचा युक्तिवाद ऐकल्यानंतर नागपूर उच्च न्यायालयाने राजू लहाने यांची जमानत नाकारली आहे राजू लहाने यांच्या वतीने अँड. काळवाघे यांनी कामकाज पाहिले.