एसबीआयच्या शाखाधिकार्याच्या खूनाने हादरला लोणार तालुका.
MH 28 News Live, लोणार : तालुक्यातील हिरडवच्या स्टेट बँक शाखेत व्यवस्थापक अर्थात मॅनेजर म्हणून कार्यरत असणाऱ्या 32 वर्षीय उत्कर्ष पाटील नामक व्यक्तीचा अज्ञातांनी गळ्यावर चाकूने वार करून खून केल्याचे घटना उघडकीस आली. या घटनेमुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील लोक चांगलेच हादरले आहेत.
मुंबई भागातील रहिवासी असलेले उत्कर्ष पाटील हे हिरडव शाखेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. तीन महिन्यांपूर्वी मुंबई येथून ग्रामीण भागात परीक्षाविधी मॅनेजर म्हणून हिरडव शाखेत मॅनेजर म्हणून काम पाहत होते. केवळ तीनच महिन्यापूर्वी या भागात नोकरीसाठी आलेल्या उत्कर्ष पाटील यांचा कुणी व कशासाठी खून केलाअसेल असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मारेकऱ्यांनी चाकूने त्यांच्या गळ्यावर वार केले तो चाकू देखील घटनास्थळी ठेवलेला होता. विशेष म्हणजे खून हा रात्री थर्टी फर्स्टच्या पार्टीतून झाला की, आणखी यात काही रहस्य दडलेले आहे हे आता तपासाअंती स्पष्ट होईल.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button