
डासाळा येथे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
MH 28 News Live, उदयनगर : तिरुपती बालाजी संस्थेच्या वतीने मोहनराव नारायणा नेत्रालय नांदुरा यांचे वतीने हनुमान संस्थान डासाळा येथे आरोग्य शिबिर संपन्न दिनांक 20 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता मोफत मोतीबिंदू बीपी व शुगर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ८५ रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.
सदर शिबिरामध्ये ८५ नागरिकांची तपासणी करण्यात आली त्यापैकी ३० रुग्णांची शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित झाले. ह्या शस्त्रक्रिया मोहनराव नारायण नेत्रालयाच्या वतीने अकराशे रुपयांमध्ये होणार असून इतर सर्व खर्च संस्थांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यापैकी दहा ते पंधरा पेशंटचे चष्म्याचे निदान झाले असून चष्मे सुद्धा तीनशे रुपयांमध्ये मिळतील अशी माहिती संस्थांच्या वतीने देण्यात आली. या वेळी मोहनराव नारायणा नेत्रालयाच्या वतीने मारुती देशमाने, विठ्ठल सोनाग्रे, ऋषिकेश पाटील, मधुर पाटील, संतोष वावगे यांच्यासह डासाळा येथील पोलीस पाटील संदीप खुमकर तंटामुक्ती अध्यक्ष उमेश पैठणे, रघुनाथ गवई, माजी सरपंच डी एस काळे, सनद बेलोकर, राजेश पैठणे, उपसरपंच पती सिद्धार्थ पैठणे, सुरेश शिंदे, सुभाष खुमकर, पंचकुला साठे, तुलसीदास साठे, सरिता बेलोकार, संजय बोर्डे तसेच अनेक नागरिक शिबीरासाठी उपस्थित होते.