
मंत्री संजय राठोड यांचा जिल्हा दौरा
MH 28 News Live, बुलडाणा : अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड मंगळवार, दि. ३१ जानेवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
राठोड यांच्या दौऱ्यानुसार, मंगळवारी, दि. ३१ जानेवारी रोज सकाळी दहा वाजता सुंदरखेड येथील संत सेवालाल महाराज मंदिर मैदान येथे बंजारा समाज सहविचार सभेस उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 12 वाजता बिबी, ता. लोणार कडे प्रयाण करतील. दुपारी दोन वाजता बिबी येथील बंजारा समाज सहविचार सभेस उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता मंठा, जि. जालन्याकडे प्रयाण करतील.