♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

भगवान महावीर जयंतीदिनी चिखलीत कत्तलखाने व मांसविक्री बंद ठेवावी – जैन समाजाची मागणी

MH 28 News Live, चिखली : येत्या १४ एप्रिल रोजी श्री. १००८ महावीर जयन्ती उत्सव साजरा होत असल्याने अहिंसेचे थोर उपासक असलेले भगवान श्री महावीर यांच्या जन्मदिनी शहरातील कत्तलखाने व मांसविक्री बंद ठेवण्यात यावी अशी मागणी जैन समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

श्री १००८ महावीर दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष श्रीकांत जैन यांनी जैन समाजातर्फे दि. ८ एप्रिल रोजी यासंदर्भात नगर पालिका मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले आहे. महावीर जयंती निमित्त शहरातून भव्य शोभायात्रा काढली जाते. हा दिवस जैन समाजासाठी फार मोठा व महत्त्वाचा असतो. भगवान महावीरांचा संदेश हा अहिंसा परमो धर्म असल्याने महावीर जयंती निमीत शहरातील कत्तलखाने व मांस विक्री दुकान बंद ठेवावे असे आदेश काढावे अशी विनंती पालिका प्रशासनाला या निवेदनातून करण्यात आली आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129