♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी भाई सिद्धार्थ पैठणे

 

MH 28 News Live / चिखली : पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी भाई सिद्धार्थ अंकुश पैठणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश भाई उन्हवणे यांनी १ ऑक्टोबर रोजी नियुक्तीपत्र देत ही घोषणा केली भाई सिद्धार्थ अंकुश पैठण हे गेल्या १५ ते २० वर्षापासून आंबेडकरी चळवळीत सक्रिय कार्यरत असून सामाजिक प्रश्नांसह सर्वसामान्य जनतेच्या विविध समस्या सोडवण्यासाठी सातत्याने काम करीत आहेत. त्यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे नियुक्तीनंतर बुलढाणा जिल्ह्यात गावागावात पक्षाच्या शाखा स्थापन करून कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभी करणे संघटन विस्ताराला गती देणे तसेच वंचित शोषित व सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी वैचारिक आणि लोकशाही मार्गाने संघर्ष करण्याचे हवा पक्षाकडून करण्यात आले आहे आगामी काळात जिल्ह्यात पक्षाची विचारधारा विचारधारा तळागाळात पोहोचविण्यासाठी युवक व सामाजिक कार्यकर्त्यांना संघटनेची जोडण्याची मोठे आवाहन भाई सिद्धार्थ पैठने यांच्यासमोर असणार आहे त्यांच्या नियुक्तीमुळे बुलढाण्यातील पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या सकारात्मक विस्ताराला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129