
दुष्काळग्रस्त भागातील शासकीय सवलतींची माहिती ग्रामपंचायत स्तरावर जाहीर करा ! शिवाजी शिराळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
MH 28 News Live / चिखली : जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर झाल्यानंतर शासनामार्फत शेतकरी व ग्रामीण नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध सवलती, योजना, मदत व सुविधांची माहिती ग्रामपंचायत स्तरावर सार्वजनिकपणे वाचून दाखवावी, अशी मागणी युवा नेते शिवाजी किसनराव शिराळे पाटील यांनी ७ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या विविध निर्णयांचा लाभ मिळणे आवश्यक आहे. मात्र अनेक नागरिकांना शासनाने जाहीर केलेल्या सवलती, अनुदाने, कर्जसवलत, पिकांचे नुकसान, पाणीटंचाई, चारा, रोजगार तसेच इतर मदतीच्या योजनांची पुरेशी माहिती मिळत नसल्याचे
ग्रामपंचायत कार्यालयात शासनाच्या सर्व दुष्काळसंबंधी योजना व सवलतींची माहिती दर्शनी भागात लावावी, विशेष ग्रामसभा घेऊन शासन निर्णयांचे वाचन करावे आणि पात्र लाभार्थ्यांना अर्ज करण्यासाठी मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शिराळे पाटील यांनी केली आहे.
दहा प्रमुख मागण्यांवर भर
निवेदनातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सवलती व योजनांची अधिकृत माहिती ग्रामपंचायतीत प्रसिद्ध करणे, विशेष ग्रामसभा घेणे, जनजागृती मोहीम राबविणे, पात्र लाभार्थ्यांना अर्ज प्रक्रियेत मदत करणे, पिकांचे नुकसान व पाणीटंचाईसह विविध बाबींची माहिती देणे, माहिती उपलब्ध करून देणे गरजेचे आहे,



