
माजी नगराध्यक्ष सुहास शेटे यांचा पुढाकारातून मोफत रक्त तपासणी शिबिर संपन्न
MH 28 News Live, चिखली : शिक्षण प्रसारक मंडळ, चिखली द्वारा संचालित सुनिल रामसिंह चुनावाले आयुर्वेद महाविद्यालय संलग्नीत डॉ. हेडगेवार आयुर्वेद रुग्णालय व ग्रामिण रुग्णालय, चिखली, हिंद लॅब्स एच.एच. एल. लाईफ केअर लिमिटेड पुरस्कृत (भारत सरकारचा उपक्रम) यांच्या संयुक्त विद्यमाने आ. श्वेताताई महाले व शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी नगराध्यक्ष सुहास शेटे यांच्या संकल्पनेतून मोफत रक्त तपासणी शिबीर शुक्रवार, दि. १० फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव कैलास शेटे हे होते तर उद्घाटक म्हणून अंकुशराव पाटील हे होते. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपा शहराध्यक्ष पंडितराव देशमुख तालुका अध्यक्ष कृष्णकुमार सपकाळ, सुरेंद्रप्रसाद पांडे, शिवराज पाटील, शेख अनीस, गोविंद देव्हडे, युवराज भूसारी, सचिन कोकाटे, सुभाषआप्पा झगडे, प्राचार्य ज्योत्स्ना गुल्हाने, समाधान शेळके, नरेंद्र मोरवाल,सुनील पोफळे, संतोष काळे, सिद्धू ठेंग, शैलेश सोनुने, श्याम दिवटे, अनमोल ढोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरामध्ये मधुमेह रुग्णांसाठी, प्रास्टेट ग्रंथीच्या निदानासाठी, वंध्यत्व व इतर स्त्रीरोग निदानासाठी, रक्ताक्षशयाची विशिष्ट तपासणी किडणी व मुत्राशयासंबंधीत व्याधींच्या निदानासाठी,रक्तातील व पु मधील जंतूंची तपासणी
, स्त्रियांमधील विविध कर्करोगाच्या तपासणीसाठी, गर्भाशयातील बाळाच्या विशिष्ट अनंवांशिक व्याधीच्या निदानासाठी रक्त व लघवी तपासणी करण्यात आली यावेळी २०० च्या जवळपास रुग्णांनी तपासणी करून घेतली उद्घाटक अंकुशराव पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबाना पैशांच्या अभावी शस्त्रक्रिया करणे व विविध आजार असतील त्यावर योग्य ते उपचार घेणे, खूप अडचणीचे ठरते. यासाठी शासनाच्या विविध आरोग्य योजनेची माहिती तळागाळातील शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये पोहचत राहावी, म्हणून गावपातळीवर या प्रकारचे कॅम्प घेऊन शासनाच्या आरोग्य योजनांची जनजागृती करावी, असे आवाहनसुद्धा केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पंकज शेटे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामीण रुग्णालयाचे तसेच आयुर्वेद रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button