
” विठू नामाच्या गजरातून माणुसकीचा संदेश देणाऱ्या वारीत सहभागी व्हा ! ” — राहुल बोंद्रे यांचे काँग्रेस कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते २४ जूनला घेणार पाई दिंडीमध्ये सहभाग
MH 28 News Live / चिखली : ” टाळ मृदंगाच्या गजरात, टाळी उचलून विठ्ठलनाम गात, माणुसकीचा संदेश देणाऱ्या या वारीत एक दिवस तरी सहभागी व्हा,” असे भावनिक आवाहन जिल्हा काँग्रेस अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने संत परंपरेची उज्वल परंपरा जपणाऱ्या वारीत या वर्षी विशेष पर्वणी ठरणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे मंगळवार, २४ जून रोजी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या वारकऱ्यांसोबत दिवसभर चालणार आहेत. पुणे-सोलापूर महामार्गावरील यावत येथून सकाळी ७ वाजता ते दिंडी क्रमांक २७२ मध्ये सहभागी होणार असून, यावेळी राहुल भाऊ बोंद्रेही त्यांच्यासोबत वारीचा अनुभव घेणार आहेत.
वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून सामाजिक समतेचा, बंधुत्वाचा आणि एकतेचा महाउत्सव आहे, असे सांगताना बोंद्रे म्हणाले, “संत नामदेवांनी सुरू केलेल्या पंथाचे आधारस्तंभ संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम आहेत. त्यांनी समाजातील जातीभेद, अंधश्रद्धा, स्त्रीदास्य यांच्यावर प्रहार करत मानवतेचा मार्ग दाखवला. हीच वाट आपण चालण्याची गरज आहे.”
वारीत सहभागी होताना धर्म, जात, लिंग किंवा वर्ग यांचे बंधन राहत नाही. “या भक्तीमय वाटेवरून चालताना प्रत्येकजण फक्त वारकरी असतो – एक भाविक, एक माणूस. वारी माणसांना जोडते. यातूनच आदर्श समाज निर्माण होतो,” असेही बोंद्रे यांनी स्पष्ट केले. प्रत्येकाने निदान एक दिवस तरी वारीत चालून या अनुभवातून आत्मिक आनंद, सामाजिक एकात्मता व संस्कृ