♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

वैश्विकता डोक्यात ठेवा त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही – विजय पांढरे

MH 28 News Live, उदयनगर : येथून जवळच असलेल्या बोरी अडगाव येथे मुस्लिम बांधवांच्या वतीने मनोमिलन व मानवता धर्म याविषयी कार्यक्रमाचेआयोजन दिनांक १० मे रोजी करण्यात आले होते ,या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे सेवानिवृत्त अधिक्षक अभियंता विजय पांढरे हे अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश गावातील वातावरण हे खेळीमेळीचे व जातीय सलोखा कायम राहावा यासाठी हा कार्यक्रम दरवर्षी साजरा केला जातो यामध्ये डॉ. हटकर त्याचप्रमाणे शेख इरफान मोहम्मद या वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये त्यांनी मोबाईलच्या युगात संवाद हरपला त्यामुळे माणसातील आपआपसातील जिव्हाळा संपला असे उदगार डॉ. संतोष हटकर यांनी केले, त्यानंतर विजय पांढरे बोलताना म्हणाले की आपन विकारामध्ये गुंतल्यामुळे आपण धर्म समजू शकलो नाही त्यामुळे आपापसात मतभेद होऊ लागले हे मतभेद संपवायचे असेल तर अशा कार्यक्रमाची गरज आहे त्याचप्रमाणे हे मतभेद जर पूर्णपणे बंद करायचे असेल तर मानवाने वैश्विकता डोक्यात ठेवली तर दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही,असे उद्गार काढले. शेख इरफान मोहम्मद यांनी आपल्या मनोगतात मध्ये सांगितले की इस्लाम हा कधीही चुकीच्या गोष्टीचे समर्थन करत नसून नेहमी मानवता धर्म पाळतो या वेळी या कार्यक्रमधे विजय पांढरे यांचा परिचय डॉ गुफराउल्लाह खान यांनी करून दिला, तर या वेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील, सरपंच पती सदानंद वाघमारे, हरिभक्त परायण माधव पाटील महाराज, गौतम सुरवाडे, सुभाष सुरवाडे, राजु रामकृष्ण पाटील उपस्थित होते या कार्यक्रमाला गावातील व परिसरातील सर्व समाज बांधव उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुस्लिम तरुण बांधवांनी यशस्वी प्रयत्न केले व शेवटी सर्वांना शिरखुरमा वाटप करण्यात आला.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129