♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

उघडयावरील मांसविक्रीचा विषय तापला… राकेश चोपडा यांचा आमरण उपोषणाचा इशारा

MH 28 News Live, चिखली : नगरपालिकेच्या हद्दीमध्ये डीपी रोड परिसरात शासकीय आदेशाला दावलून उभ्यावर मानस विक्री होत असल्याच्या विरोधात वारंवार अर्ज विनंती करूनही योग्य ती कार्यवाही न झाल्यामुळे डीपी रोड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राकेश चोपडा हे दि. ७ जून पासून आमरण उपोषणाला बसत आहेत.

मागील अनेक वर्षांपासून शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या डी पी रोड व पारधी बाबा रोड वरील अतिक्रमण हटवण्यासाठी वारंवार निवेदन , अर्ज, मूक मोर्चा या लोकशाही आयुधांचा वापर करणाऱ्या डी पी रोड व पारधी बाबा रोड व्यापारी असोसिएशने अतिक्रमण हटवण्यासाठी आता आमरण उपोषणाचे हत्यार उपसले असून केवळ कागदी घोडे नाचवणारे प्रशासन आता तरी या विषयाकडे गांभीर्याने पाहिल काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत डीपी रोड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राकेश चोपडा यांनी जिल्हाधिकारी बुलडाणा यांना पत्र देऊन अतिक्रमण हटवण्यासंदर्भात व उघड्यावर होणाऱ्या मांसविक्री विरोधात करण्यात येणाऱ्या आमरण उपोषणाची माहिती दिली. या उपोषणामध्ये अनेक सामाजिक कार्यकर्ते व व्यापारी बांधव सहभागी होणार आहेत. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की , जिल्हाधिकारी कार्यालयाने दि. २२/०९/२०२२ रोजी यासंदर्भात आदेश पारित केला असूनही अद्यापर्यंत कोणत्याही कार्यालयाने त्या अधिसूचनेच्या अंमल बजावणीसाठी कार्यवाही केलेली नाही. तसेच मागील काही दिवसांपासून डि पी रोड, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग ( जिनींग प्रेसिंग कडे जाणारा रस्ता ) या ठिकाणी रस्त्यावर उघडयावर मांसविक्री होत आहे. मात्र त्यावरही कुठलीही कारवाई होत नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आपल्या कार्यालयाचे जा क्रं. गृहविभाग कक्ष ४-२ कवि/१२१६/२०२२ दि. २१/०९/२०२२ यांच्या ओदशाची अंमलबजावणी करण्यात यावी व उपरोक्त ठिकाणी सुरु असलेली उघडयावरील मांस विक्री बंद करण्यात यावी या मागणीसाठी दि. ७ जून २०२३ पासून हिंदुसूर्य महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याजवळ आमरण उपोषणास बसणार आहोत त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाल्यास व जिवीताचे काही बरेवाईट झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असे देखील त्यांनी शेवटी नमूद केले आहे.

निवेदनाच्य प्रतिलीपी आ. श्वेताताई महाले, पोलीस अधिक्षक बुलडाणा, उपविभागीय अधिकारी बुलडाणा, तहसिलदार चिखली, मुख्याधिकारी न प चिखली यांना देण्यात आले असून अतिक्रमणाबाबत गांधारीची भूमिका घेणारे प्रशासन या निवेदनाकडे किती गांभीर्याने बघते हे पाहावे लागेल. निवेदन देताना त्यांच्यासमवेत अशोक भोलाने , दिपक गुळवे, उद्धव सुरडकर, शामसुंदर खरपास, विलास पाटील , गजानन जाधव , अमोल भोजवाणी, दत्ता सालकुटे व जोत्स्नाताई नागरे यांच्यासह अनेक व्यापारी बांधव उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129