प्रतिबंधित मांगूर माशाची तस्करी; ३ जण अटकेत, १२ लाखांचा मुद्देमाल जप्त: शेगांव पोलिसांची मोठी कारवाई
MH 28 News Live, शेगाव : प्रतिबंधित असलेल्या मांगूर माशाची चोरटी वाहतूक केल्याप्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी आठ जणांविरुध्द कारवाई केली. तीन टन मांगूर माशासह १२ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तिघांना अटक केली आहे. मांगूर माशाची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांना मिळाली होती त्यावरून काल रात्री शेंगव शहर पोलिसांनी हि कारवाई करण्यात आली. यांनतर आज मत्स्य विभाग, पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाने संयुक्त कारवाई करीत मांगूर माशांना पंचासमक्ष नष्ट करण्यात आले.
मांगूर माशाची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांना गृरुवारी रात्री मिळाली त्यानुसार सापळा रचून जळगाव खानदेशकडून आंद्रप्रदेशाकडे जाणाऱ्या टाटा आशर ट्रक (एमएच ४० सीडी ९०३०) हा शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मिळून आला. ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित असलेला मांगूर मासे जिवंत आढळून आले.याबाबतची माहिती पोलिसांनी मत्स्य विभाग बुलढाणा यांना दिल्यावरून आज शुक्रवारी तपासणी आणि पंचनामा केल्या यानंतर ३ टन जिवंत मांगूर मासे नगर पालिकेच्या डम्पिंग ग्राउंड मध्ये नष्ट करण्यात आले. यात १२ लाख ४० हजार मुद्देमाल ज्यामध्ये अंदाजे तीन टन वजनाचे अंदाजे अडीच लाख रुपये किमतीचे मासे आणि एक टाटा आयशर कंपनीचा मालवाहतुकीचा ट्रक असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button