
दुकानांचे नामफलक मराठी भाषेत असणे अनिवार्य..दारुच्या दुकानांवर महापुरूषांचे व किल्ल्यांचे नावे टाकण्यास बंदी
MH 28 News Live, बुलडाणा : प्रत्येक दुकानाचे नामफलक सुरूवातीला मराठी भाषेत नाव असणे बंधनकारक असल्याची तरतुद महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नोकरीचे व सेवाशर्तीचे विनयिम अधिनियम, २०१७ मध्ये सुधारणेद्वारे करण्यात आली आहे.
उक्त अधिनियमाच्या कलम ७ अन्वये ज्या आस्थापनेत १० पेक्षा कमी कामगार आहे. अशा सर्व आस्थापनांना कलम ३६ क (१), कलम ६ अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक आस्थापनेत १० पेक्षा अधिक कामगार आहे. अशा सर्व आस्थापनेच्या नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये असणे बंधनकारक राहील. मात्र अशा आस्थापनेच्या नियोक्त्याकडील देवनागरी लिपीतील मराठी भाषे व्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेतील व लिपीतील नामफलक देखील असू शकतात. मराठी भाषेतील अक्षरलेखन नामफलकावर सुरूवातीलाच लिहीणे आवश्यक असेल व मराठी भाषेतील अक्षराचा टंक अर्थात फाँट, आकार इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असणार नाही याची दक्षता घ्यावी. ज्या आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा विकले जाते. अशी दुकाने नामफलकावर महान व्यक्तींची किंवा गड किल्यांची नावे लिहीणार नाही, असा बदल शासनाने 17 मार्च 2022 रोजी सदर अधिनियमात केला आहे. जिल्हयातील सर्व अस्थापना मालकांनी उक्त तरतुदींचे तंतोतंत पालन करावे. सदर तरतुदीचे भंग करणाऱ्या आस्थापना मालका विरुध्द करवाई करण्यात येईल. याची नोंद घेण्यात यावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी आ.शि. राठोड यांनी केले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button