
रिपब्लिकन सेनेमध्ये जळगाव जामोद तालुक्यातील कार्यकर्त्याचा जाहीर प्रवेश
MH 28 News Live, चिखली : रिपब्लिकन सेनेमध्ये जळगाव जामोद तालुक्यातील कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विजयकांत गवई यांच्या हस्ते जळगाव जामोद तालुकाध्यक्षपदी शुभम गुरुदेव यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा कार्याध्यक्ष सलीमभाई, जिल्हा उपाध्यक्ष ब्रह्मा साळवे यांच्या हस्ते अन्य कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष सागर डबरासे, विदर्भ अध्यक्ष योगेंद्र चवरे, मुजिबभाई पठाण, युवा प्रदेशअध्यक्ष किरण घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडाणा जिल्ह्यातील बहुजनांना न्याय देण्याचे काम आता फक्त रिपब्लिकन सेनेने हाती घेतले आहे असे प्रतिपादन पक्षाचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष विजयकांत गवई यांनी या प्रसंगी मार्गदर्शन करताना केले.
जळगाव जामोद तालुक्यातील सावरगाव या ठिकाणी गवई यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान दलित वस्तीमध्ये साचलेले सांडपाणी व गावाकडे जाण्यासाठी रस्ता यासंदर्भात गटविकास अधिकारी जळगाव जामोद यांना निवेदन देऊन चर्चा केली. पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी लेखी आश्वासन देउन दलित वस्तीकडे नदी ओलांडून जाण्यासाठी नदीतले घाण पाणी साफ करू व सिमेंट गोलपाईप टाकून व सिमेंट रस्ता तयार करू असे लेखी आश्वासन दिले.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button