
माळवद कोसळून दोघा बापलेकाचा दुर्दैवी अंत; शेलोडी येथील घटना
MH 28 News Live / चिखली : मौजे शेलोडी ता चिखली येथे जुने माळवद कोसळून बाप लेकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आज, १७ मार्चच्या पहाटे ही घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार शेलोडी येथील दामोदर घाडगे यांना जुने माळदाचे घर पाडून नवे घर बांधायचे होते. त्यासाठी त्यांनी माळवद पाडण्याचे काम त्यांनी गावातीलच शालिग्राम वाळूस्कर यांना दिले होते. आज, १७ मार्चच्या सकाळी शालिग्राम वाळूस्कर त्यांचा मुलगा योगेश, राम घाडगे, सुनील नेमाने हे माळवद पाडण्याचे काम करत होते. त्यावेळी जीर्ण झाले बांधकाम जुन्या लाकडांसह मजुरांच्या अंगावर कोसळले. यात शालिग्राम वाळूस्कर (६५) आणि त्याचा मुलगा योगेश वाळूस्कर (३२) यांचा मृत्यू झाला. राम घाडगे आणि सुनील नेमाने, राम घाडगे, गजानन घाडगे हे दोघे जखमी झाले असून गावकऱ्यांच्या मदतीने त्यांना बाहेर काढन्यात आले. यातील दोघांवर चिखली येथील जवंजाळ हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. मृतकांचे शवविच्छेदन चिखली ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. वृत्तलेपर्यंत अमडापूर पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याची नोंद झाली नव्हती.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button