
अवैध दारू विक्रेत्यांची वाढली मस्ती; गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू
MH 28 News Live / चिखली : जिल्ह्यात अवैध दारू विक्रेत्यांची मस्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एका दारू विक्रेत्याने पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या दुचाकी वाहनाला लाथ मारल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. याची घटना आज, २३ मार्चला दीड वाजेच्या सुमारास चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ जवळ घडली. हा प्रकार घडला असून यामध्ये एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी देखील झाला आहे. दोन्ही पोलीस कर्मचारी अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. भागवत गिरी असे मृत्यू झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून राम आंधळे जखमी झाले आहेत.
प्राप्त माहितीनुसार अंढेरा पोलीस स्टेशनचे राम आंधळे आणि भागवत गिरी दुचाकीने शेळगाव आटोळ परिसरात पेट्रोलिंग करत होते. शिवणकर नामक अवैध दारू विक्रेता दारूचे बॉक्स घेऊन शेळगाव आटोळकडे येत होते. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून शिवणकरला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र मिसाळवाडी ते शेळगाव आटोळच्या मध्ये शिवणकरने पोलिसांचा दुचाकीला लाथ मारली, त्यामुळे दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकली. यात दुचाकी चालवणारे भागवत गिरी यांचा जागीच मृत्यू झाला. जखमी राम आंधळे यांना घेऊन कृष्णा मिसाळ यांनी चिखली येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.. शिवणकर घटनास्थळावरून पसार झाला आहे..
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button