
महसूल, डाक,वीज वितरण आणि बँका ह्या कर्मचाऱ्यांचा संप. जळगाव जामोदमध्ये आढळले लॉक डाउन सारखे चित्र
MH 28 News Live, जळगाव जामोद : कर्मचाऱ्यांच्या विविध ९ संघटनानी शनिवार , रविवारची सुट्टी वगळता मार्च अखेर संपाचे हत्यार उपसल्याने जणू काही कर्मचाऱ्यांनी लॉक डाउन केल्याचे भासत होते
महाराष्ट्रातील महसुल व प्रशासन विभागात अनेक वर्षापासून महसुल सहायक पदाची पदभरती करण्यात आलेले नसल्याने अनेक पदे रिक्त असून दोन ते तिन रिक्त पदाचा अतिरिकत प्रभार महसुल सहायक कर्मचाऱ्यांकडे सोपिवण्यात आलेला आहे. महसूल कर्मचाऱ्यांवर यामुळे अतिरिक्त ताण पडत आहे. तसेच नायब तहसिलदार हे महत्वाचे पद असून नायब तहसिलदार हा संवर्ग राज्य सवंर्ग म्हणून घोषित करण्यात आल्याने अव्वल कारकुन/ मंडळ अधिकारी या संवर्गातून मागील काही वर्षापासून नायब तहसिलदार पदाच्य पदोन्नती केलेली नाही. त्यामुळे प्रत्येक विभागातील, तहसिल कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय येथे नायब तहसिलदार पदाचे अनेक पदे रिक्त असून त्याचाही अतिरिक्त प्रभार सध्याचे कार्यरत असलेले नायब तहसिलदार यांचेवर अतिरिकत स्वरुपात सोपिवण्यात आलेने जनतेचे आणि प्रशासनाचे कामकाजा खोंळबलेले आहे.
त्यामुळे महाराष्ट्र महसुल कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य, यांनी शासनास विविध मागण्याची नोटीस दि. २१ फेब्रुवारी २०२२ रोजी देवून, नागरीकांना होणाऱ्या त्रासाबाबत सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. महसूल कर्मचारी संघटनेने केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये राज्यातील महसुल विभागात महसुल सहायकाची पदे मोठया प्रमाणावर रिक्त असून महसुल कर्मचारी प्रचंड तणावाखाली काम करीत असल्यान शासनाने तात्काळ पदभरती करावी, अव्वल कारकुन/ मंडळ अधिकारी संवर्गातील नायबतहसिलदान संवर्गात पदोन्नतीचे प्रस्ताव मंत्रालयात दिड ते दोन वर्षापासून प्रलंबित असून दिनांक १० मे २०२१ चे शासन निर्णय अन्वये नायब तहसिलदार हा सवंर्ग राज्य संवर्ग म्हणून घोषित करण्यात आलेला आहे त्यानुसार सब अव्वल कारकुन/ मंडळ अधिकारी यांच्या सेवाजेष्ठता यादृया राज्यस्तरावर एकत्र करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. सदर प्रक्रिया ही अन्यायकारक असून नायब तहसिलदार हा संवर्ग राज्य संवर्ग म्हणून तात्काळ रद्द करुन नायब तहसिलदार यांचे पदोन्नती विभाग स्तरावर करण्यात याव्यात. तसेच सर्व कर्मचारी अधिकार यांनी जुनी पेन्शन योजना तात्काळ सुरु करावी. याप्रमाणे मागण्या असून त्या पूर्ण न झाल्यास दिनांक २१ मार्च २०२२ पासून आंदोलनाचे स्वरुप ठरविण्यात आले होते. त्या दिवशी जेवणाच्य सुट्टीत कार्यालयाच्या दारावर निर्देशने करणे, दि. २३ मार्चला कार्यालयात काळया फिती लावून कामकाज करणे, दि. २८ मार्च रोजी एका दिवसाचा लाक्षणीक संप करणे. आणि दि. ४ एप्रिल पासून बेमुदत संप करण्यात येणार आहे.
महसूल कर्मचारी संघटनेच्या आंदोलनाच्या कार्यक्रमानुसार आज तहसिल कार्यालय जळगाव जामोदचे महसूल कर्मचारी यांनी संपात सहभागी होवून निर्देशने केली. त्यामध्ये ११ अव्वल कारकून व १९ लिपिक सहभागी झाले होते.
डाक विभाग, वीज वितरण व बँकांच्या कर्मचाऱ्यांनी देखील आज देशव्यापी संप पुकारला होता. या संपाचा परिणाम सुधीर आढळून आला. डाक विभागाचे शहरातील १३ कर्मचारी ग्रामिण ११ ठिकाणचे २२ कर्मचारी विद्युत विभागाचे सहाय्यक अभियंता सह इतर विभागातील सर्व कर्मचारी संपात सामील आहे
स्टेट बँक व खाजगी बँक, पत संस्था सोडून इतर बँका संपावर गेले आहे त्यामुळे नागरिकाची कुचंबना होत आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button