
व्हॉईस ऑफ मीडिया संलग्नित चिखली तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी युसूफ शेख तर सचिवपदी अमोल जोशी
MH 28 News Live, चिखली : व्हॉईस ऑफ मीडिया संलग्नित चिखली तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी युसूफ शेख यांची तर सचिवपदी अमोल जोशी यांची आज दिनांक २५ डिसेंबर रोजी स्थानिक विश्राम गृहावर पत्रकार संघाच्या झालेल्या बैठकी मधे अविरोध निवड करून कार्यकारिणी घोषित करण्यात आली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्य संघटक सुधीर चेके पाटील हे होते तर प्रमुख उपस्थितीत टी वी जर्नलिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष गोपाल तुपकर,व् हॉईस ऑफ मिडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश पळसकर उपस्थित होते. या बैठकीत पहिल्या कार्यकारीणीचा कार्यकाळ संपल्यामुळे नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी युसुफ शेख, सचिव अमोल जोशी, उपाध्यक्ष पवन लढ्ढा, काशिनाथ शेळके,सहसचिव विनोद खरे, कोषाध्यक्ष विजय गोंधणे, कार्यालयीन चिटणीस समीर शेख, संघटक पवन शिराळे, सहसंघटक संजय भालेराव, प्रसिधीप्रमुख आकाश डोणगावकर, विधी सल्लागार तनजीम हुसेन, कार्यवाहक रंगनाथ सावळे, सदस्य बळीराम गुंजाळ, शिवदास जाधव, ओमप्रकाश खत्री, प्रफुल देशमुख, रतन पठाडे, रवी कुळसुंदर, गजानन पठाडे, यांची निवड अविरोध करण्यात आली. यावेळी सुधीर चेके पाटील यांनी व्हॉईस ऑफ मीडियाचया कार्याबद्दल विस्तृत माहिती उपस्थितासमोर विषद केली व रविवारी बुलढाणा येथे होणाऱ्या कार्य शाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
यावेळी सुधीर चेके पाटील यांची व्हॉईस ऑफ मीडियाच्या राज्य संघटकपदी निवड झाल्याबद्दल तसेच गोपाल तुपकर यांची टी व्ही जर्नालिस्ट असोसिएशनच्या जिल्हाध्यक्ष पदी व मंगेश पळसकर यांची व्हॉईस ऑफ मीडिया च्य जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पत्रकार संघाचे मार्गदर्शक अनिल पळसकर, महेश वाधवानी, प्रकाश मेहेत्रे, संजय खेडेकर, समाधान गाडेकर, उद्धव थुट्टे पाटील यांनीही नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या



