♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

एक्का बादशाह जुगारावर पोलिसांचा छापा १३ जुगारी पकडले, २७ हजाराचा मुद्देमाल जप्त

MH 28 News Live / देऊळगाव राजा : तालुक्यातील देऊळगाव मही शिवारात सुरू असलेला एक्का बादशाह जुगारावर आज ता. २३ पोलिसांनी पंचा समक्ष छापा टाकून एक्का बादशाह जुगार खेळणाऱ्या १३ जुगाऱ्यांना रंगेहात पकडले. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईत २७ हजार ३५० रुपये रोख जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे देऊळगाव मही येथील जुगाऱ्यांमध्ये खळबळ माजली.

याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार पोलिसांना मिळालेल्या खबरीनुसार देऊळगाव मही शिवारात सुरू असलेल्या एक्का बादशाह जुगारावर आज रविवारी पंचा समक्ष पोलिसांनी छापा टाकला. यावेळी तेरा जुगारी जुगार खेळताना रांगेहात पकडण्यात आले. दरम्यान पोलीस हेडकॉन्स्टेबल माधव नारायण कुटे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सतीश साहेबराव खिल्लारे वय ३२, ज्ञानेश्वर गोपाळ वाघ वय ३८, रवी सुधाकर शिंगणे वय २९, योगेश प्रल्हाद गुडघे वय ३० सर्व राहणार देऊळगाव मही, दिगंबर प्रल्हाद भागिले वय ४५ रा. टाकरखेड भागिले, परमेश्वर तुकाराम भागिले वय ३५, रा टाकरखेड भागिले, किसन संतोष सूर्यवंशी वय २४, रा. दे. मही,, एकनाथ अशोक कायंदे वय २८ रा बायगाव खुर्द, संतोष प्रल्हाद भागिले वय ४७ परमेश्वर पंढरीनाथ भागिले वय २७ , गणेश माधवराव भागिले रा. टाकरखेड भागिले, तुषार जालिंदर खिल्लारे वय २८ व नितीन बबन खिल्लारे रा. दे मही यांच्यावर मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. ठाणेदार ब्रह्मगिरी यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी मारलेल्या छाप्यात १३ जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून पोलीस उपनिरीक्षक नितीन मिंड पुढील तपास करीत आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129