♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

बेकायदेशीर गोमांस विक्रीप्रकरणी चिखलीत एकावर गुन्हा दाखल

MH 28 News Live / चिखली : बाबुलाज चौक, चिखली येथे सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर गोवंश सदृश्य मांस विक्रीप्रकरणी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस स्टेशन चिखली येथे महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 नुसार अप.क्र. 331/2025 अंतर्गत कलम 5, 5B, 5C, 9, 9A अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

फिर्यादी पोलीस नाईक अमोल गवई यांच्या तक्रारीवरून नईम खा अयुब खा (वय 42, रा. बाबुलाज चौक, चिखली) याच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली. दि. 03 मे 2025 रोजी सकाळी 6.42 ते 7.30 वाजेदरम्यान, आरोपी आपल्या घरासमोरच सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे गोवंश सदृश्य मांस विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली.

पोलिसांनी घटनास्थळी सुमारे 45 किलो गोवंश सदृश्य मांस (अंदाजे किंमत 6,750 रुपये), लोखंडी सुरा (200 रु.), लाकडी ठोकळा (100 रु.), लोखंडी तराजू (100 रु.), तसेच वजन मोजण्यासाठी वापरले जाणारे लोखंडी मापे (किंमत 200 रु.) असा एकूण 7,350 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार विजय गीते करत आहेत. आरोपीविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई सुरू आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129