♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

वरुन किर्तन, खालून तमाशा… अश्लील चाळे उघड झालेल्या त्या किर्तनकार महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न; तर पुरुष किर्तनकारावर कारवाईची मागणी

MH 28 News Live, संभाजीनगर: हरिनाम संकीर्तनाच्या माध्यमातून समाजात आध्यात्म, भक्तिभाव आणि नैतिकतेचा प्रचार प्रसार करण्याचे कार्य वारकरी संप्रदायातील कीर्तनकार परंपरेनुसार करत असतात. भागवत धर्माची फार मोठी उज्ज्वल परंपरा लाभलेल्या या कीर्तनकारांपैकी काही जणांचा पाय मात्र आता हळूहळू घसरू लागल्याचे दिसत आहे. नुकत्याच संभाजीनगर जिल्ह्यात उघड झालेल्या एका घटनेमध्ये एका पुरुष कीर्तनकाराचे एका किर्तनकार महिलेशी असलेले अनैतिक संबंध व्हिडीओ क्लिपद्वारे उघड झाल्यामुळे मोठी खळबळ माजली. दरम्यान या प्रकरणातील सदर महिलेने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्‍न केला असून संबंधित कीर्तनकारावर कारवाई करण्याची मागणी काही लोकांनी निवेदनाद्वारे पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

यातील आणखी खेदाची बाब म्हणजे या व्हिडिओत या किर्तनकारासोबत असणारी महिलादेखील किर्तनकार आहे. या प्रकारातील ४८ वर्षाचे पुरुष किर्तनकार वैजापूर तालुक्यातील आहेत तर ४० वर्षाच्या महिला किर्तनकार सिल्लोड तालुक्यातील आहेत. एका हॉटेलमधील रुममध्ये करत असलेल्या ‘ उद्योगा ‘ चा हा व्हिडिओ आहे. ३ मिनिटांचा हा व्हिडिओ हे किर्तनकार महाराज स्वत:च बनवत असल्याचेही या क्लिपमध्ये स्पष्ट होत आहे.

गेल्या तीन दिवसांपासून हा व्हिडिओ संभाजीनगर जिल्ह्यात प्रचंड व्हायरल झाला आहे. यातील महिलेची होत असलेली बदनामी सहन न झाल्याने तिने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्यावर औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुरुष किर्तनकारही अत्यंत तणावाखाली आहेत. त्यांनी असे टोकाचे पाऊल उचलू नये यासाठी त्यांच्यावर त्यांचे नातेवाईक लक्ष ठेऊन आहेत.

दुसरीकडे या भोंदू महाराजाला अटक करावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सेनेचे सिल्लेगाव पोलिसात निवेदन दिले आहे. या किर्तनकारांचे हजारो अनुयायी असून त्यांच्या या कृत्यांमुळे सर्वसामान्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या असल्याचा आरोप या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129