♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

पंच्याहत्तर हजाराची लाच घेताना शासकीय अभियंत्याला पकडले; निवृत्त अपर जिल्हाधिकारी तक्रारदार

MH 28 News Live / शेगाव : महसूल विभागातील निवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तब्बल पंच्याहत्तर हजार रुपयांची लाच स्वीकारताना एका स्थापत्य अभियंत्यास (सिव्हिल इंजिनिअरला) रंगेहात पकडण्यात आले. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष पथकाने शेगाव येथे ही कारवाई केली.

शेगाव नगरितील मुरारका महाविद्यालय मार्गावरील चंद्रलोक सोसायटीमध्ये काल बुधवारी, ७ मे रोजी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. प्रकरणी आज गुरुवारी, ८ मे रोजी उत्तररात्री ४ वाजताच्या सुमारास शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अभियंत्यास अटक करण्यात आली असून त्याला सोबत घेऊन लाच लुचपत विभागाचे पथक बुलढाण्यात आज गुरुवारी सकाळी दाखल झाले.

प्रशांत महादेव बानोले (वय ५३ वर्ष, राहणार गांधी चौक शेगाव, जिल्हा बुलढाणा) असे आरोपी अभियंत्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ ए नुसार शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा आज उत्तर रात्री चार वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पावणेपाच वाजता आरोपी अभियंत्यास अटक करण्यात आली आहे.

दिनकर नारायण रायपुरे, ( वय ८४ वर्षे, राहणार चंद्रलोक सोसायटी, मुरारका कालेज रोड, शेगाव जिल्हा बुलढाणा) असे फिर्यादी चे नाव आहे. ते सेवानिवृत्त अपर जिल्हधिकारी आहेत. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यलयात व इतर ठिकाणी त्यांनी विविध पदावर काम केले आहे. फिर्यादी यांची पत्नी विमल दिनकर रायपुरे यांचे नावे असलेल्या शेत जमीनचे व्यावसायीक अकृषक (एनए) प्रकरण नगर रचना विभाग बुलढाणा येथे सादर करण्यात आले आहे.या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मार्फत हे काम करून देतो, माझी चांगलीच ओळख आहे अशी बतावणी आरोपी प्रशांत महादेव बनोले याने केली.त्यासाठी त्याने मोठ्या रकमेची मागणी केली. तडजोडीअंती पाऊण लाखात सौदा ठरला. मात्र ही बाब न पटल्याने दिनकर रायपुरे यांनी एसीबीकडे रीतसर तक्रार दिली. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल बुधवारी रात्री उशिरा सापळा रचला. यावेळी तक्रारदार रायपुरे यांच्या चंद्रलोक सोसायटी मधील राहत्या घरी पाऊण लाख रुपये स्वीकारताना आरोपी बनोले यास रंगेहात पकडण्यात आले. एसीबी चे पोलीस निरीक्षक रमेश यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.या कारवाईसाठी शेगाव शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन पाटील व त्यांच्या सहकऱ्यांनी सहकार्य केले.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129