
केंद्रीय कर्मचाऱ्यांना खूशखबर…! DA मध्ये होणार एवढी वाढ
MH 28 News Live : माहे जानेवारी २०२३ पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुर्वलक्षी प्रभावाने महागाई भत्त्यामध्ये ४ टक्के वाढ करण्यात आली आहे . सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३८ टक्के दरांने महागाई भत्ता मिळत आहे , यामध्ये केंद्र सरकारने चार टक्के वाढ केल्याने , आता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना ४२ टक्के दरांने डी.ए मिळणार आहे .हा वाढीव महागाई भत्ता हा केंद्रीय कामगार मंत्रालयाने जाहीर केलेल्या AICPI च्या निर्देशांकानुसार जाहीर करण्यात आलेला आहे.
सदरचा वाढीव चार टक्के महागाई भत्ता पुढील महिन्यांपासून प्रत्यक्ष वेतनासोबत अदा करण्यात येणार असून , माहे जानेवारी व फेब्रुवारी २०२३ या दोन महिन्यातील डी.ए फरक देखिल रोखीने वेतनासोबत अदा करण्यात येणार आहे .यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनांमध्ये मोठी वाढ होणार आहे , हा वाढीव डी.ए निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना देखिल माहे जानेवारी २०२३ पासून लागू करण्यात येणार आहे.