
‘ संघर्ष शेतकरी लढ्याचा ‘ पुस्तकाचे झाले थाटात प्रकाशन
MH 28 News Live, चिखली : बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी चळवळीला आपले जीवन अर्पण करणाऱ्या शेतकरी योध्याच्या जीवनावर “आधारित संघर्ष शेतकरी लढ्याचा ” या पुस्तकाचे चिखली येथील केशवराव बाहेकर शेतकरी सभागृहात सोमवार दिनांक 18 एप्रिल रोजी हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते थाटात प्रकाशन पार पडले.
यावेळी मंचावर उत्कृष्ट संसद पटू पुरस्कार प्राप्त असलेले माजी आमदार वामनराव चटप, शेतकरी संघटनेचे प्रांतध्यक्ष ललित बहाळे, चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले, माजी आमदार राहुल बोद्रे, शशिकांत खेडेकर, तोताराम कायंदे, माजी जि. प. सदस्य एकनाथ थुट्टे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास कणखर, नामदेवराव जाधव, बद्री बुधवत, समाधान कणखर, डॉ विनायक वाघ, डॉ सत्येंद्र भुसारी, वामनराव जाधव, सुनील देशमुख, नंदकिशोर सवडतकर, समाधान सुपेकर, आमनुल्ला खान, भानुदास घुबे, भिकाभाऊ सोळंकी, रमेशअण्णा मुळे, राजेंद्र वाघ, डॉ सुरेश हाडे, एकनाथ थुट्टे, सुरेश हाडे, विलास मुजुमले, बबन चेके, शिवप्रसाद सारडा, अँड दिनेश जपे, कैलास फाटे, सुरेश वानखेडे, रमाकांत महाले इत्यादी उपस्थित होते.
जिल्ह्यातील शेतकरी चळवळीवर प्रकाश टाकताना वामराव चटप यांनी सत्तेत नसलेल्या आमदाराना व राज्यात सत्तेवर असणाऱ्या पक्षाच्या माजी आमदारांना आपण शासनाकडे शेतीच्या नवीन तंत्रज्ञानाला परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत तीच शेतकऱ्यांसाठी आपली मोठी मदत होईल. तर एफएमएससी हे शेतकऱ्यांच्या मालाचे केवळ संकलन केंद्र आहे ते शेतकऱ्यांना भाव देऊ शकत नाही तर उलट एफएमसी धान्याची भेसळ केंद्रे बनली आहेत. तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांच्या आणि देशाच्या हिताचे आहे त्याला कुणीही विरोध करू नये.असे शेतकरी संघटनेचे प्रांताध्यक्ष ललित बहाळे यांनी बोलताना म्हटले.
आमदार श्वेताताई महाले बोलताना म्हणाल्या की शेतकऱ्याच्या हितासाठी केंद्र सरकारने तीन कायदे आणले होते पण दुर्दैवाने त्याचे राजकारण करून विरोधकानी त्याला विरोध केला. ईडीची भीती भ्रष्टाचाऱ्यांना वाटते सामान्यांना नाही ज्यांनी चोऱ्या केल्या ते आडकतील त्याबद्दल आरडाओरडा करायची गरज नाही. माजी आमदार राहुल बोंद्रे हे कॉग्रेस जिल्हाध्यक्ष असल्याने त्यांनी पक्ष बांधणीसाठी विविध पक्ष संघटनेचा अभ्यास केला त्यातील शेतकरी संघटनेच्या चळवळीच्या बांधणी बद्दल कुतूहल व्यक्त करून इतर संघटना पक्षा पेक्षा शेतकरी संघटनेच्या कार्यक्रमा मध्ये महिलांची उपस्थिती पहाता याचे कारण आपल्याला अद्याप समजले नाही तसेच वैचारीक मतभेद असले तरी सुद्धा आरएसएस या संघटनेच्या बांधणीचेही त्यांनी कौतुक केले. ईडी बद्दल आता भीती वाटायला लागली आहे इडीचा गैरवापर केला जात असल्या आरोप त्यांनी यावेळी केला.



