
पूरग्रस्त परिस्थितीत जीव धोक्यात घालून केले पत्रकारितेचं कर्तव्य; HDR उद्योग समूहाकडून पत्रकार छोटू कांबळे यांचा सन्मान
MH 28 News Live / चिखली : “हर सफलता की दर्द भरी कहानी होती है, क्युकी कामीयाबी मेहनत की दीवानी होती है” या ओळींचं जिवंत उदाहरण ठरले चिखली येथील पत्रकार छोटू कांबळे.
दि. १८ ऑगस्ट रोजी चिखली शहरात मुसळधार पावसाने भीषण पूरस्थिती निर्माण केली असताना, नागरिकांमध्ये भयाचे वातावरण होते. अशा वेळी जिवाची पर्वा न करता शहराच्या कानाकोपऱ्यात फिरून त्यांनी परिस्थिती जनतेपर्यंत पोहोचवली. रुद्रावतार घेतलेल्या पावसात त्यांनी दिलेलं हे थेट वार्तांकन पत्रकारितेच्या कर्तव्याची खरी ओळख ठरलं. कुठलाही व्यावसायिक हेतू न ठेवता, फक्त जनतेच्या माहितीसाठी आणि समाजाला खऱ्या परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी केलेल्या या निस्वार्थी प्रयत्नाबद्दल HDR उद्योग समूह, चिखली यांच्या वतीने छोटू कांबळे यांचा सन्मान करण्यात आला. या सन्मानप्रसंगी HDR उद्योग समूहाचे संचालक गोविंदभाऊ देव्हडे, रंजीत देव्हडे, स्वीकार देव्हडे आणि HDR MH 28 फिटनेस टीम उपस्थित होती. पत्रकार छोटू कांबळे यांना आकर्षक सन्मानपत्र फ्रेम भेट देऊन पत्रकारितेतील त्यांच्या पराक्रमाचा सन्मान,सत्कार करण्यात आला. HDR उद्योग समूहाने या कार्यक्रमातून स्पष्ट संदेश दिला – पत्रकारिता ही फक्त बातमी देणं नाही, तर समाजासाठी जबाबदारी पार पाडण्याचं काम आहे. छोटू कांबळे यांनी निभावलेली ही भूमिका त्याचे उत्तम उदाहरण ठरली आहे.