
येत्या दोन वर्षात भारतातील रस्ते असे बदलणार; गडकरींनी सांगितला मेगा प्लॅन
MH 28 News Live : येत्या दोन वर्षात भारतामधील रस्त्यांचे जाळे आणि त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा अमेरिकेच्या दर्जाचे करण्याचे नियोजन केंद्र सरकारने केले आहे, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत दिली.
कॉंग्रेस खासदार एल. हनुमंथैय्या यांच्या प्रश्नावर उत्तर देत होते. रस्ते अपघातातील मृतांची संख्या कमी करण्यासाठी रस्ते सुरक्षेसंदर्भात लोकांमध्ये जनजागृतीची आवश्यकता आहे, असे स्पष्ट केले.
भारतात रस्त्यांचे मोठे जाळे उभारणे ही सध्या एकमेव समस्या नसल्याचे सांगून रस्ते उभारणी तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, लोकांमध्ये जनजागृती आणि शिक्षण हे देखील मुद्दे यामध्ये महत्त्वाचे ठरतात, असे ते म्हणाले. राष्ट्रीय महामार्गांवर वाढणारी अपघातांची संख्या आणि राष्ट्रीय महामार्गांना जोडणाऱ्या रस्त्यांचे रूंदीकरण ही केंद्र सरकारसाठी मोठी चिंतेची बाब आहे. त्यासाठीच रस्ते वाहतूक मंत्रालय प्रयत्न करत आहे. दरवर्षी देशात रस्ते अपघातात तब्बल दीड लाखांहून जास्त लोक मृत्यूमुखी पडतात अशी आकडेवारी नितीन गडकरी यांनी राज्यसभेत सादर केली.



