♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मलकापूरजवळ भीषण अपघात; चार ठार, पाच गंभीर जखमी

MH 28 News Live / मलकापूर : मुक्ताईनगरकडून मलकापूरकडे येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर १७ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एका कारने भरधाव वेगात ट्रेलरला मागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर पाच प्रवासी गंभीर जखमी झाले.

या अपघातात मृतांमध्ये कार चालक साजिद अजीज बागवान (रा. अज्ञात) याचा समावेश असून इतर तीन महिला प्रवाशांची ओळख अद्याप पटू शकली नाही. अपघातग्रस्त वाहन हे मारुती ईको कार (क्र. एम एच ४६ एक्स ३१२०) असून नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडल्याचे समजते.

जखमींमध्ये संतोष तेजराव महाले (४०, रा. चिखली, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव), पंकज दिलीप गोपाळ (२२, रा. नांद्रा हवेली, ता. जामनेर, जि. जळगाव), दीपिका विश्वास (३०, रा. कोलकाता, प. बंगाल), टीना अजय पाटील (४५, रा. भुसावळ, जि. जळगाव) आणि अजून एका महिलेचा समावेश आहे. एका जखमी महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. सर्व जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या अपघातानंतर मलकापूर येथील दसरखेड एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून चौघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार हेमराज कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129