♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

न. पा. निवडणूक प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर. १७ मार्चपर्यंत मागवले आक्षेप. निवडणुकीबद्दलची अनिश्चितता मात्र कायम

MH 28 News Live, बुलडाणा : जिल्ह्यासह राज्यातील मुदत पूर्ण केलेल्या नगरपालिका निवडणुकांच्या निवडणुकीसंदर्भात राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले असून सदर नगरपालिकांच्या अंतर्गत प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा आज दि. १० मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. येत्या १७ मार्च पर्यंत या प्रारूप प्रभाग आराखड्यावर आक्षेप नोंदवण्याची मुदत देण्यात आली असून त्यानंतर आलेल्या हरकती स्वीकारल्या जाणार नाहीत असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय तथा जिल्ह्यातील सर्व नगरपालिका कार्यालयांना राज्य शासनाच्या वतीने पाठवण्यात आलेल्या पत्रामध्ये यासंबंधी सविस्तर आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील ९ नगरपालिकांचा कार्यकाळ संपला असून या गोष्टीला तीन महिने पूर्ण होऊन गेले आहेत. परंतु, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असल्याच्या कारणामुळे ही निवडणूक राज्यशासनाने न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढे ढकलली आहे. ताज्या न्यायालयीन घडामोडींच्या संदर्भात नगरपालिका निवडणूक प्रक्रिया राज्य शासन कधी सुरू करणार या संदर्भात सध्या तरी अस्पष्टता कायम असेल. मात्र राज्य शासनाने विधानसभेत पारित केलेल्या विधेयकाच्या पूर्वी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असल्याकारणाने नगर पालिकांमधील प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा आज दिनांक १० मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आला असला तरी आगामी नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात प्रभाग रचना जाहीर करण्यात आली असून या प्रभाग रचनेवर आक्षेप नोंदवण्यासाठी येत्या १७ मार्च पर्यंत मुदत देण्यात आली आहे. ही अंतिम मुदत मुदत संपल्यानंतर आलेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नसल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु असे असले तरी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने गेल्या तीन – चार दिवसांपूर्वी विधीमंडळांमध्ये पारित केलेल्या विधेयकानुसार राज्य निवडणूक आयोगाला राज्य शासनाच्या राज्य शासनाला विचारल्याशिवाय राज्यात निवडणुका घेण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे येणाऱ्या नगरपालिका निवडणूकख नेमक्या कधी होतात, या निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा नेमकी केव्हा होते याबद्दलची अनिश्चितता मात्र अद्याप कायम आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129