♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

पुन्हा ५ कोटींच्या मातोश्री पादंण रस्त्यांना मान्यता मिळविण्यात आ. श्वेताताई महाले यांना यश 

MH 28 News Live, चिखली : मतदारसंघातील विविध गावांमधील मातोश्री पादंण रस्त्यांच्या निकषानुसार नव्याने ५ कोटी रुपये किंमतीच्या बुलढाणा तालुक्यातील एकूण ३२ शेत / पाणंद रस्त्यांच्या कामांना मान्यता मिळविण्यात आ. सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या अथक प्रयत्नां अखेर यश आले आहे .

 

मातोश्री शेत / पादंण रस्ते योजने अंतर्गत सन २०२२ – २३ या वर्षाच्या आराखड्यात शासनाने मान्यता प्रदान केली आहे . विशेष म्हणजे दि. ३ मार्च रोजी ६३ किलोमीटर लांबीच्या १५ कोटी रुपये किंमतीच्या पाणंद रस्त्यांना आ. श्वेताताई महाले यांच्या प्रयत्नांने मान्यता मिळाली होती . तसेच ९ मार्च रोजी शासनाने पुन्हा बुलडाणा तालुक्यातील ५ कोटी रुपये किंमतीच्या ४८ किलोमीटरच्या ३२ रस्त्यांना शासनाने सहमती दिली आहे. तसेच आ. श्वेताताई महाले यांनी चिखली विधानसभा मतदारसंघातील शेत पाणंद रस्त्यांचा विकास व्हावा यासाठी आ. श्वेताताई महाले यांनी सातत्याने प्रयत्न केले. यासाठी मागील वर्षी सुरू असलेल्या  पालकमंत्री पादंण रस्ता योजनेअंतर्गत ४ कोटी रुपये किंमतीच्या जवळपास ३५ किलोमीटर लांबीचे रस्ते मंजूर केले होते. सदर मंजूर शेत पाणंद रस्त्यांची काही कामे पूर्ण तर काही प्रगतीत आहे. यामुळे पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेतून ४ कोटी रुपये किंमतीचे ३५ किलोमीटर , मातोश्री पादंण रस्ते योजनेतील ९ मार्च च्या यादीतील १५ कोटी रुपये किंमतीच्या ६३ किलोमीटरच्या ६२ रस्त्यांना तर आता ९ मार्च च्या यादीप्रमाणे ५ कोटी रुपये किंमतीच्या ४८ किलोमीटर लांबीच्या ३२ रस्त्यांना म्हणजेच एकूण १४६ किलोमीटर लांबीच्या २४ कोटी रुपये किंमतीच्या एकूण ११७ रस्त्याना मान्यता मिळविल्याने आतापर्यंत कधी नव्हे एवढ्या शेत पाणंद रस्त्यांची कामे होणार असून चिखली मतदार संघातील जास्तीत जास्त शेत पाणंद रस्ते विकास करून शेती व शेतकरी समृद्ध करण्यावर भर असल्याचे आ. श्वेताताई महाले यांनी यावेळी सांगितले आहे .

 

दुसऱ्या यादीत भडगाव ते मायंबा संस्थांपर्यंत, भडगाव गावठाण ते भिवसिंग देवाने यांची शेतापर्यंत , चांडोल येथील मेहताब सिंग चांदा ते सरस्वती शाळेपर्यंत , चांडोल म्हसला खू , चांडोळ  ते इरला धाड येथील शालिग्राम सरोदे ते गणेश बाजी यांचे शेतापर्यंत, पोतदार ते अमीर बागवान यांचे शेतापर्यंत ,  जि प शाळा ते महादेव मंदिरापर्यंत , जगदंबा शाळेपासून शिंदी शिवारा पर्यंत , जांब येथील जांब ते बस स्टँड पंढरीनाथ खंडाळे यांच शेत , कोठा पांदन रस्‍ता ते स्मशान भूमी , पंढरीनाथ खंडाळे एकनाथ गणपत सूसर यांचे शेतापर्यंत , म्हसला खुर्द रायसिंग तायडे ते किसन तायडे , बोधेगाव ते धोंडखेड , विलास रामकृष्ण गोष्ट भोंडे ते मौंढाळा  , मौंढाला येथील बाबुराव लक्ष्मण काळे ते मारुती काळे यांचे शेतापर्यंत , रामेश्वर नारायण सपकाळ ते मोठेबा गजानन सपकाळ यांचे शेतापर्यंत, रुईखेड मायंबा येथील वामन नेमणार मोहोज ते डोंगराकडे जाणारा रस्ता, आनंता गजधाने ते  साहेबराव उगले , मोहोज रस्त्यावरील महादेव मंदिरा पासून ती पांडुरंग वाघमारे यांचे शेतापर्यंत , जामठी येथील पाण्याच्या टाकी पासून ते विष्णू शेषराव तायडे ,

धायरी स्मशानभूमी पासून ते संतोष संपत सोनुने यांच्या शेतापर्यंत , डोमरुळ येथील डोमरुळ ते धाड ,डोमरुळ ते कुंबेफळ , सातगाव म्हसला येथील प्रमोद पालकर ते भानुदास कृष्णा शिंदे , नारायण पाटीलबा देठे ते कुंबेफळ स्मशानभूमी , दुधा येथिल गणेश नामदेव सोनवणे व सुभाष सोनुने यांच्या शेतापासून दिनकर तुकाराम सोनवणे व नारायण लक्ष्मण सोनवणे यांच्या शेतापर्यंत, मसला खुर्द बोधेगाव पासून विश्वास आनंद जामुंदे , धामणगाव येथील उत्तम फकीरा पायगन ते काशीला सूर्यभान पोटदुखे सिद्धार्थ सुरडकर यांचे घर ते देवीच्या मंदिरा पर्यंत, सोयगाव येथील पंगरखेड ते धारेश्वर मंदिर , मातला येथील केसापुर मातला ते माळवंडी या रस्त्यांचा समावेश आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129