
कोरोनाचे कमबॅक… प्राप्त 276 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 02 पॉझिटिव्ह
MH 28 News Live, बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड चाचणीद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 278 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 276 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 02 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळा चाचणीमधील 2 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोग शाळेतील 64 तर रॅपिड टेस्टमधील 212 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 276 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगाव तालुका : टेंभुर्णा 1, मोताळा तालुका : खेर्डी 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 2 नवीन संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे.
त्याचप्रमाणे आजपर्यंत 811971 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 98321 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 98321 आहे. आज रोजी 30 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 811971 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 99022 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 98321 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचा उपचार घेत असलेला 13 रूग्ण आहे. तसेच आजपर्यंत 688 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.