
ऋषी पंचमी निमित्त डोणगावला पाच क्विंटल महाप्रसाद वाटप
MH 28 News Live, डोणगांव : येथे दि. 1 सप्टेंबर ला ऋषी पंचमी निमित्त स्थानिक गजानन महाराज संस्थान डोणगांव यांच्या वतीने पाच क्विंटल बेसन पोळीचा लाडू महाप्रसाद वाटप करण्यात आला.
सर्व प्रथम गजानन महाराज याची आरती करण्यात आली त्यानंतर संस्थान अध्यक्ष डॉ गजानन उल्हामाले माजी कृषी सभापती राजेंद्र पळसकर, विलासराव पळसकर, सुरेश बाजड, गजानन जाधव, रामभाऊ चव्हाण, बबन पाटील, ज्ञानोबा कावले, सुभाष आढाव, संजय पळसकर, सुरेश फिसके, विठ्ठल शिंदे, बबनराव भुजबळ, रामेश्वर काळे, संतोष जैस्वाल, अनिल आलेगावकर, समाधान सदार, मधुकर घिरके, विकास शिंदे, उत्तम परमाले, विष्णू काळे अनुप पळसकर, प्रशांत चोपडे, भानुदास कराळे यांच्या हस्ते भाविक भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी शेकडो महीला व पुरुष भाविक भक्तांनी शिस्तीत महाप्रसादाचा लाभ घेतला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावकरी व संस्थानचे सदस्यांनी परिश्रम घेतले.