♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

परवाच्या अपघाताबद्दल रामदास आठवले काय म्हणाले ?

MH 28 News Live : सिंदखेड राजानजीक ३० जूनच्या मध्यरात्री समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताविषयी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले ( Ramdas Athawale ) यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या अपघाताची सखोल चौकशी करावी अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

या अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहताना ना. रामदास आठवले म्हणाले की, मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मृतांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाने ५ लाखांची सांत्वनपर मदत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ लाखांची सांत्वनपर मदत जाहीर केली आहे. हा अपघात भयंकर आणि दुःखदायक होता. समृद्धी महामार्गावर अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे समृद्धी महामार्ग हा मृत्यूचा सापळा ठरू नये, यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे; मात्र सर्व यंत्रणा आणि वाहनचालकांनीसुद्धा सावधानी ठेऊन पुन्हा असे अपघात होऊ नये याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129